सप्टेंबर-ऑक्टोबरमधील फिफा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी २६ सदस्यीय संघाची घोषणा; भारताचा सामना कोणासोबत?
भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमधील फिफा आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कालावधीसाठी २६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
पुढील महिन्यातील आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कालावधी भारतीय फुटबॉल संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्य प्रशिक्षक यांनी सोमवारी २६ सदस्यीय संघाची घोषणा केली, जो पनामा, ब्राझील आणि उरुग्वे यांच्याविरुद्ध तीन मोठे आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात २६ सप्टेंबर रोजी बंगळूरु येथे पनामाविरुद्ध करेल. त्यानंतर संघ कोलकाता येथे जाईल, जिथे ३ ऑक्टोबर रोजी पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलचा आणि ६ ऑक्टोबर रोजी दोन वेळच्या विश्वविजेत्या उरुग्वेचा सामना करेल. तसेच या तिन्ही संघांनी या वर्षीच्या फिफा विश्वचषकात भाग घेतला आहे. अशा परिस्थितीत, जागतिक दर्जाचे खेळाडू असलेल्या संघांविरुद्ध आपली क्षमता आजमावताना भारतीय संघासमोर एक मोठे आव्हान असेल.
माहितीनुसार राष्ट्रीय संघाचे शिबिर १४ सप्टेंबर रोजी बंगळूरु येथे सुरू होईल. पनामाविरुद्ध खेळल्यानंतर, भारतीय संघ २८ सप्टेंबर रोजी कोलकातासाठी रवाना होईल. त्यानंतर संघ ब्राझील आणि उरुग्वेसारख्या बलाढ्य संघांचा सामना करेल.
भारताचा २६ सदस्यीय संघ
गोलरक्षक: अल्बिनो गोम्स, गुरप्रीत सिंग संधू, प्रभसुखन सिंग गिल, सोम कुमार
बचावपटू: अभिषेक सिंग टेकचम, आकाश मिश्रा, अन्वर अली, बिजय वर्गीस, हिंगथनमाविया राल्टे, जय गुप्ता, प्रमवीर, रिकी मीतेई हाओबाम.
मिडफिल्डर: अनिरुद्ध थापा, आशिक कुरुनियन, फारुख चौधरी, लालेंगमाविया राल्टे, मॅकार्तन निक्सन, मोहम्मद सॅनन, रिकी शाबोंग, सहल अब्दुल समद.
फॉरवर्ड्स: एडमंड लालरिंदिका, इरफान यादव, मनवीर सिंग, रहीम अली, रायन विल्यम्स, विक्रम प्रताप सिंग.
भारतीय संघ वेळापत्रक
26 सप्टेंबर: भारत विरुद्ध पनामा, श्री कांतीरवा स्टेडियम, बेंगळुरू
3 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ब्राझील, विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, कोलकाता
6 ऑक्टोबर: भारत विरुद्ध उरुग्वे, विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, कोलकाता
Edited By- Dhanashri Naik