1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (07:52 IST)

आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन

आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे  यांचे निधन झाले आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता बुधवारी  रात्रीच वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाला काही तास उलटतात तोच मोनालीने ही अखेरचा श्वास घेतला .
 
उत्कृष्ट महिला नेमबाज व आपल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवणाऱ्या मोनाली गोऱ्हे  यांनी नाशिकमध्ये अनेक खेळाडूंना घडवलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयानेही मोनाली यांच्या कार्याची दखल घेत तिची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आणि साऊथ एशियन गेम्स मध्ये १-२ पदकांवर समाधान मानणाऱ्या श्रीलंकन संघाला तब्बल ८ पदके पटकावली. नाशिक मधील फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल मध्ये मोनालीने अनेक वर्ष रायफल शूटिंगचे प्रशिक्षण दिले होते.
 
दुर्दैवाने त्यांचे वडिल मनोहर गोऱ्हे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली व पाठोपाठ मोनालीला पण कोरोना संक्रमण झालं.त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातचं विशेषतः नेमबाजी, रायफल शूटिंग खेळाडुंचे अतोनात नुकसान झाले आहे.वडिलांच्या निधना नंतर काही तासातच मुलीच्या निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.