शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रोम , मंगळवार, 11 मे 2021 (15:20 IST)

सेरेना विलियम्स कसून सरावानंतर पुनरागमनासाठी सज्ज

ऑस्ट्रेलियन ओपननंतर सेरेनाविलियम्सच्या भावनिक इशारंना निवृत्तीचे संकेत समजले जात होते. मात्र, या दिग्गज टेनिस खेळाडूने तीन महिन्यांनंतर कसून सराव करत पुनरागमनाची तयारी केली आहे. यंदाच्या वर्षी फ्रेब्रुवारीमध्ये मेलबर्नमध्ये उपान्त्य फेरीत नाओमी ओसाकाकडून पराभूत झाल्यानंतर सेरेना मागील तीन महिन्यांपासून मार्गारेट कोर्टच्या विक्रमी 24 ग्रॅन्डस्लॅम किताबाची बरोबरी साधण्यासाठी सराव करत आहे.
 
इटली ओपनद्वारे टेनिसमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयारी करत असलेल्या सेरेनाचे लक्ष्य फ्रेंच ओपनमध्ये दमदार कामगिरी करण्यावर आहे. यामुळे ती आपले प्रशिक्षक पॅट्रिक मोरातोग्लोयू यांच्या मार्गदर्शनाखाली क्ले कोर्टवर सराव करत आहे.
 
सेरेना म्हणाली की, आम्ही मागील काही आठवडे खूपच कसून सराव केला आहे. मी खूप चांगले अनुभवत आहे. अपेक्षा आहे की, येथे काही चांगले सामने मिळतील. तसेच पुन्हा एकदा ग्रॅन्डस्लॅमध्ये भाग घ्यायचा आहे. मी त्यासाठी रोमांचित झाली आहे.
 
अमेरिकेची ही 39 वर्षीय खेळाडू मार्गारेट कोर्टच्या विक्रमापासून बरोबरी साधण्यापासून एक ग्रॅन्डस्लॅम दूर आहे. ती फ्रेंच ओपनपूर्वी रोममध्ये नादिया पोडोरोस्का किंवा लॉरा सीगेमुंडविररुध्द आपल्या अभियानाला प्रारंभ करेल.