मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (23:01 IST)

12 कोटीचे डोस एकर कमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे : मुख्यमंत्री

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील सध्याच्या कोरोना स्थितीबाबत त्यांनी जनतेला माहिती दिली. राज्य सरकार काय प्रयत्न करीत आहे कोरोनाची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनची मागणी पूर्ण केली जाईल, अशी व्यवस्था आपण करीत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेचे सूतोवाच करतानाच त्यासाठीची तयारी, नियोजन आणि अंमलबाजवणी यावर अधिक भर दिला. तसेच, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण 1 मे सुरू होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले.
 
महाराष्ट्रातील 6 कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची योजना मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
 
१ मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरणाची सरकारने तयारी केली आहे. तेवढी हिम्मत सरकारने ठेवली आहे. शिस्त लागेपर्यंत थोडा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोंधळ उडू नये म्हणून लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका. मी हात जोडून विनंती करतो की गर्दी करु नका. तूर्त 3 लाख लसी आलेल्या आहेत. त्यांचं वर्गीकरण लोकसंख्येनुसार केलं आहे. लग्नसमारंभ शिस्तीने पार पाडा. उत्साहाला थोडी मुरड घालावी. लग्नासाठी 25 जणांची मर्यादा घातलेली आहे. तसेच दोन तासांत लग्न समारंभ पार पाडावेत. धार्मिक, सामाजिक तसेच कोणत्याही राजकीय कार्यक्रमारव आपण बंधनं घातली  आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
आपण खुप चांगले नियोजन करीत आहोत. आरोग्य व्यवस्था वाढवत आहोत सध्या आहे त्यापेक्षा अधिक कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे जबाबदारी सर्वांचीच आहे. लॉकडाऊन लावल्याने आपण बाधितांचा आकडा नियंत्रित केला आहे. आयसीयु बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स सर्वच आपण वाढवले आहेत. बाहेरच्या राज्यातून आपण ऑक्सिजन आणत आहोत
रुग्णसंख्या स्थिरावली आहे.
रेमडेसिविर मागणी मोठी वाढली आहे. सरासरी ५० हजार इंजेक्शनची मागणी आहे. आज जवळपास ३५ हजाराच्या आसपास मिळत आहेत. सर्वांना विनंती आहे की, रेमडेसिविरचा वापर अनाठायी करु नका. दुष्परिणामांचा इशारा देण्यात आला आहे.  सर्व सरकारी रुग्णालयात आपण ऑक्सिजन प्लान्ट साकारत आहोत. गॅस ऑक्सिजन प्लान्टच्या ठिकाणी आपण जम्बो कोविड सेंटर साकारत आहोत. आपण कोणताही प्रयत्न सोडत नाहीत. सर्वतोपरी काम सुरू आहे. कोरोना योद्धे अहोरात्र काम करीत आहेत. ते किती ताण सहन करणार. नाशिक, विरार येथे दुर्घटना घडल्या. जिवावर उदार होऊन सर्व जण काम करीत आहेत. नाशिकचे कर्मचारी अक्षरशः रडले. आम्ही ज्यांच्यासाठी अहोरात्र काम करतोय त्यांचा जीव गेला त्याबाबत त्यांना खुपच दुःख झाले. आपल्याला आता टीम म्हणून, कुटुंब म्हणून काम करायचे आहे. काही त्रुटी असतील तर तत्काळ वरिष्ठांना सांगा.
राज्य सरकारने ज्या घोषणा लॉकडाऊनपूर्वी केल्या त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आपण कुठेही कमी पडत नाहीय किती लाटा येणार हे माहित नाही. आपण किती आणि कसे प्रयत्न करीत आहोत यावर सर्व अवलंबून आहे. आपण आतापासूनच तिसऱ्या लाटेच्या संकटाचा सामना करण्यासाठी काम सुरू केले आहे. दुसरी लाट एवढी मोठी येईल अशी अपेक्षा नव्हती अर्थचक्र न थांबवता राज्य सरकार सर्वतोपरी काम करेलतिसऱ्या लाटेची तयारी करताना विविध घटकांशी मी बोललो आहे. लसीकरणात आपण एक नंबर आहोत. राज्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी नागरिकांना आपण मोफत डोस देणार आहोत. १२ कोटी डोस आपण तत्काळ खरेदीसाठी तयार आहोत. पण, सध्या एवढ्या लसीचा डोस उपलब्ध नाहीत. सर्व उत्पादकांशी बोलत आहोत. मे महिन्यात १८ लाख डोस मिळणार आहेत.  केंद्राचे पत्र आले आहे.  ३ लाख डोस आले आहेत. म्हणजेच मागणी एवढा पुरवठा नाहीय. लस देऊन आपल्याला नागरिकांना सुरक्षित करायचे आहे. 
 
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण आपण सुरू करीत आहोत. प्रत्येक राज्याचे अॅप करुन ते मुख्य अॅपला जोडा अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे. यामुळे अनेक प्रश्न दूर होतील. संयम ठेवा. सर्वांना लस मिळेल. लसीचा पुरवठा मर्यादित आहे.जून, जुलैपासून पुरवठा वाढेल, अशी चिन्हे आहेत. लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, ही विनंती. लसीकरण केंद्र कोरोना प्रसाराचे केंद्र ठरु नये, याची काळजी घ्यायची आहे.
१८ ते ४४ वयोगटासाठी राज्याला ३ लाख डोस आले आहेत. त्यामुळे लसीकरण होईल. फक्त घाई करु नका. केंद्र सरकारला विनंती आहे की लसीचे डोस आम्हाला अधिक पुरवा. आम्ही कोरोनावर नक्की मात करु