1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (18:29 IST)

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात लसीकरण सुरू होण्याची शक्यता

Vaccination is likely to start on May 1 on the eve of Maharashtra Day
१ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं होतं मात्र आता अतिशय नाममात्र स्वरूपात लसीकरण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.
 
लसींचे डोस अपुरे असल्यामुळे आणि नव्या डोसचा पुरवठा देखील पुरेसा नसल्यामुळे १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आज राजेश टोपे यांनी १ मे पासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातले संकेत दिले आहेत. “१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. यासाठी अपॉइंटमेंट मिळेल त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. ज्यांची नोंदणी होईल त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे”, असं राजेश टोपेंनी नमूद केलं.
 
राजेश टोपे यावेळी म्हणाले की आम्ही सिरमला पत्र लिहिले होते. त्यांनी मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस देण्याचे म्हटले. भारत बायोटेक कोवॅक्सिनचे ४ ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज १८ लाखांपर्यंत जाईल अशात १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल.