मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (16:15 IST)

खळबळजनक : रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये भेसळ

बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनमध्येही भेसळ करण्याचे संतापजनक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये मागील आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात रेमडीसिवीर विकताना पकडल होतं. आता यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलीय, ती म्हणजे रेमडेसिवीरच्या बॉटल्समध्ये सलाईनचे पाणी टाकून विकले गेले आहे. 
 
 बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीला बनावट इंजेक्शन देण्यात आलं. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी दोघा जणांना रंगेहात पकडलं, या प्रकरणात अधिक तपासाअंती धक्कादायक बाब समोर आली. घटनेतील आरोपी कंपाउंडर असून त्याने रुग्णालयातील इंजेक्शनच्या बाटल्यात सलाईनचे पाणी टाकून हे इंजेक्शन 22 हजारांना विकण्याचा प्रयत्न केला.