1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (16:17 IST)

हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन मागे घेण्याचे आदेश

रायगड जिल्ह्यातील हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून पुरवण्यात आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन मागे घेण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. संबंधीत कंपनीच्या विनंतीवरुनच हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 28 आणि 29 एप्रिल रोजी विविध ठिकाणच्या 90 जणांना या इंजेक्शनमुळे त्रास झाल्याच्या तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
28 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडूनसुमारे 510 रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यात आले होते. पैकी 310 इंजेक्शन जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना देण्यात आले होते. 29 एप्रिल रोजी तेथील रुग्णांना सदरचे इंजेक्शन टोचण्यात आल्याने सुमारे 90 रुग्णांना काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने कोविकोफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल 21013 इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत.