रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (10:02 IST)

Neeraj Chopra Diamond League Final:इतिहास रचला, डायमंड लीग फायनल जिंकणारा पहिला भारतीय ठरला

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची चांगली कामगिरी सुरूच आहे. नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत 88.44 मी. हे विजेतेपद पटकावणारा नीरज  हा पहिला भारतीय खेळाडू आहे. नीरजने यापूर्वी 2017आणि 2018 मध्येही अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती, जिथे तो अनुक्रमे सातव्या आणि चौथ्या स्थानावर  होता. मात्र यावेळी नीरजने डायमंड ट्रॉफी जिंकून आणखी एक यश संपादन केले.  
 
झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये नीरजची सुरुवात खराब झाली होती आणि त्याचा पहिला थ्रो फाऊल होता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने   88.44 मीटर अंतरावर भालाफेक करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर आघाडी घेतली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर,  पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर फेक केली.