शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (09:04 IST)

निखत झरीनला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण

नवी दिल्ली येथे सुरू असललेल्या महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने सुवर्णपदक पटकावलं आहे.निखतने 26 मार्च झालेल्या सामन्यात व्हिएतनामच्या एनगुयेन थी तॅम हिचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. या निमित्ताने निखत झरीनने महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी करून दाखवली आहे. तिच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याचं दिसून येतं.
 
निखत झरीन हिचा आजवरचा प्रवासही अत्यंत रंजक आहे. जाणून घ्या तिच्या कारकिर्दीविषयी -
 
स्वतःच्या हक्कांसाठी मेरी कोमशी भिडली होती निखत
ट्विटरवर ट्रेंड होत असल्यामुळे निखत आज खूप खूष आहे. आज ती जिंकल्यामुळे ट्विटरवर ट्रेंड होतेय. पण 2019 मध्ये मात्र तिला ट्विटरवर चांगलंच ट्रोल केलं जात होतं.
 
तेव्हा तिने तत्कालीन क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांच्याकडे सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरी कोमबरोबर तिची एक मॅच खेळवली जाण्याची मागणी केली होती. टोकिओ ऑलिम्पिकला क्वॉलिफाय होण्यासाठी ही मॅच होती.
 
ही मॅच झाली आणि निखत मेरी कोमबरोबर 1-9 ने हारली. या मॅचनंतर मात्र मेरी कोमने निखतशी हात मिळवणंसुद्धा टाळलं होतं.
 
ही मॅच सपाटून हारल्यानंतर तिला ट्विटरवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
 
भारतीय महिलांचा बोलबाला
निखत झरीनचा विजय मोठा मानला जातो कारण भारताला आतापर्यंत एकूण दहा सुवर्णपदकं मिळाली आहेत. दहा पैकी सहा पदकं एकट्या मेरी कोमने मिळवली आहेत.
 
मेरी कोम ने 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 मध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. तर इतर चार सुवर्णपदकांपैकी एकट्या 2006 साली भारताकडे तीन सुवर्णपदकं आली होती. सरिता देवी, जेन्नी आर. एल. आणि लेखा केसी यांनी ही पदकं मिळवली होती.
 
वुमन बॉक्सिंगचा 2012 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रीडा प्रकार म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र हा समावेश होण्याआधीच दहा पैकी आठ सुवर्णपदकं भारताकडे आली होती. त्यातील पाच पदकं एकट्या मेरी कोमने मिळवली होती. मेरी कोमने ऑलिम्पिक काळात 2018 मध्ये एक सूवर्ण पदक मिळवलं होतं.
 
2012 मध्ये मेरी कोमला सुवर्णपदक मिळवण्याची चांगली संधी होती. मात्र 2011 ते 2016 मध्ये ग्रेट ब्रिटनच्या निकोला अडम्सने तिचा सातत्याने पराभव केला. निकोला अडम्सला 2012 आणि 2016 मध्ये सुवर्णपदक मिळालं होतं.
 
मेरी कोमने जेव्हा 2018 मध्ये जेव्हा सुवर्ण पदक मिळवलं तेव्हा ती कुठेही त्या पदकाच्या शर्यतीत नव्हती. या सर्व कारणामुळे निखत झरीन यांचा विजय आणखी अधोरेखित होतो. मेरी कोमलाही 2012 मध्ये अशीच संधी होती.
 
"अंतिम सामना अतिशय आव्हानात्मक होता. पण मी इथे जे करायला आली होती ते मिळालं आहे त्याचा फार आनंद आहे," अशी प्रतिक्रिया निखत झरीनने बीबीसी तेलुगूशी बोलताना व्यक्त केली आहे.
 
या विजयानंतर व्हर्च्युलअ माध्यमातून तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, "हा विजय माझ्या आई- वडिलांसाठी आहे. मी जेव्हाही माझ्या आईला फोन करायचे तेव्हा ती नमाज पढत असायची, माझ्या विजयासाठी दुवा मागायची."
 
"ही दुवा कुबूल झाली आहे. हा विजय, हे सुवर्णपदक त्यांचं आहे. माझ्या वडिलांनी मला किती पाठिंबा दिला हे मला माहिती आहे. मी माझा विजय त्यांना समर्पित करते. जेव्हा माझा वाईट काळ सुरू होता तेव्हा माझ्याबरोबर कुणीही नव्हतं. फक्त माझे कुटुंबीय माझ्या बरोबर होते."
 
"माझ्या मार्गात अनेक अडथळे आलेत. त्यांनीच मला लढण्याची ताकद दिली. माझ्या दुखापतींनी मी कणखर झाले. मला कळलं की काहीही झालं तरी मला खेळायचंच आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी मी जेव्हा झोपेतून उठले तेव्हा मी देवाचा धावा केला. पूर्ण दिवस मी माझ्या खेळाबद्दल विचार केला आणि मी दिवसभर त्यातच होते."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निखत चं अभिनंदन केलं आहे.
निखत झरीनने वयाच्या बाराव्या वर्षी बॉक्सिंग करायला सुरुवात केली. तिचे आईवडील दोघंही खेळाडू आहे. निखतने सुवर्ण पदक मिळवल्यावर दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता.
 
Published By- Priya Dixit