गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

डेव्हिस करंडकात जोकोविच सहभागी

बेलग्रेड-  सार्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच डेव्हिस करंडक पुरूष सांघिक स्पर्धेत रशियाविरूद्ध मायदेशातील जागतिक गटाच्या लढतीत खेळेल. तीन ते पाच फ्रेब्रुवारीदरम्यान नसीमध्ये ही लढत होईल. जोकोचिव ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसर्‍याच फेरीत हरला. आधीच्या नियोजनानुसार तो खेळणार नव्हता पण आता वेळ असल्यामुळे तसच फॉर्म मिळविण्याच्या उद्देश्याने तो खेळेल.
 
सार्बियाने 2010 मध्ये डेव्हिस करंडक जिंकला. आपपर्यंतच्या एकमेव विजेतेपदामध्ये जोकोविचचा मोलाचा वाटा होता. दीर्घ काळ प्रशिक्षक राहिलेल्या वॉग्डान ओब्राडोविच यांच्यानंतर नेनाद झिमाँचीज यांच्याकडे सूत्रे आली आहेत. त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीचा संघ उपलब्ध असणे स्वागतार्ह ठरले आहे.
 
जोकोविच म्हणाला की डेव्हिस करंडकात खेळण्यात मी नेहमीच उत्सूक असतो. आम्ही सर्व खेळाडू एकत्र येतो, तेव्हा फार छान वाटते.