शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (16:11 IST)

Orleans Masters: प्रियांशूने ची यू जेनचा पराभव करत सुपर-300 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला

Badminton
प्रियांशु राजावतने आपला सुरेख फॉर्म कायम ठेवत ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत, त्याने जागतिक क्रमवारीत ६१व्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या ची यू झेनचा 21-18, 21-18 अशा सरळ गेममध्ये 44 मिनिटांत पराभव केला. जागतिक क्रमवारीत 58व्या क्रमांकावर असलेल्या प्रियांशूने प्रथमच सुपर-300स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. जिथे तो आयर्लंडच्या नाहट गुयेनशी स्पर्धा करेल. प्रियांशुने याआधी प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या अव्वल मानांकित केंटा निशिमोटोचा सरळ गेममध्ये पराभव करून मोठा अपसेट खेचला होता.
 
  Edited By - Priya Dixit