शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (13:56 IST)

Ostrava open 2021: सानिया मिर्झाने वर्षातील पहिले विजेतेपद पटकावले, झांगसह यूएस-न्यूझीलंड जोडीचा पराभव केला

भारताची अनुभवी महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिने वर्षाचे पहिले विजेतेपद (2021 हंगाम) जिंकले. तिने तिची जोडीदार चीनची शुई झांग सोबत मिळून ऑस्ट्रावा ओपनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित अमेरिकन ख्रिश्चन आणि न्यूझीलंडच्या रोटलिफ जोडीचा पराभव केला. भारत-चीन जोडीने एक तास आणि चार मिनिटे चाललेल्या जेतेपदाच्या लढतीत अमेरिका-न्यूझीलंड जोडीवर 6-3, 6-2 ने विजय नोंदवला.
 
 शनिवारी सानिया आणि झांगने चौथ्या मानांकित जपानी मकोतो नोनोमिया आणि एरी होजुमी उपांत्य फेरीत 6-2 7-5 ने अंतिम फेरीत प्रवेश केला सानिया या हंगामात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत खेळत होती. याआधी तिने गेल्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या डब्ल्यूटीए 250 क्लीव्हलँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत क्रिस्टीना माशलेसह स्थान मिळवले होते,जिथे ही जोडी हरली.
 
सानियाने तिच्या कारकिर्दीत एकूण सहा ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत -
सानियाने आपल्या कारकिर्दीत एकूण सहा ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत महिला दुहेरीत सानियाने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन जिंकले.त्याचबरोबर मिश्र दुहेरीत तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन जिंकले आहे.