गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (11:07 IST)

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 :उंच उडीत भारतासाठी शरद कुमार आणि मरियप्पन थांगावेलू यांनी पदके जिंकली

sharad kumar
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये, भारतीय खेळाडू शरद कुमार आणि मरियप्पन थांगावेलू यांनी उंच उडीत T63 प्रकारात रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत. या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत भारताच्या खात्यात पदक मिळवून दिले.

शरद कुमार गेल्या काही काळापासून भारतासाठी चांगली कामगिरी करत आहे. गेल्या पॅरालिम्पिकमध्येही त्याने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. आता त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
मरियप्पन थांगावेलूने पॅरालिम्पिक 2016मध्ये सुवर्ण पदक, 2020 मध्ये रौप्य पदक आणि यावेळी कांस्य पदक जिंकले आहे. त्याने सलग तीन पॅरालिम्पिकमध्ये पदके जिंकली आहेत. थंगावेलू आणि शरद कुमार यांच्याशिवाय पदकाच्या शर्यतीत आणखी एक भारतीय होता. शैलेश कुमार असे त्याचे नाव आहे. पण त्याला पदक जिंकता आले नाही आणि चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याने 1.85 मीटर उडी मारली. 
 
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत एकूण 20 पदके जिंकली असून त्यात 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत सध्या 18 व्या क्रमांकावर आहे.
Edited By - Priya Dixit