1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. president award to chandrakant parbati shinde

कबड्डीपटूला राष्ट्रपती पुरस्कार

ना. म. जोशी मार्ग येथील वीर बजरंग कबड्डी संघाचे माजी खेळाडू व विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत परबती शिंदे यांना यंदाचा पोलिस राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकताच मंडाळाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. 32 वर्षांच्या निष्कलंक सेवेबद्दल शिंदे यांचा हा गौरव करण्यात आला.
 
शिंदे हे 1980 ते 1990 च्या दशकात वीर बजरंगकडून कोपरा रक्षक व चढाईपटू म्हणून खेळले. आज ते वीर बजरंगच्या कबड्डी संघाच्या जडणघडणीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. काही काळ टाटा इलेक्ट्रिक या व्यावसायिक संघाकडून खेळल्यानंतर 1985 साली मुंबई पोलिसमध्ये खेळाडू म्हणून भरती झाले.
पुढील लेख
क्रिकेटपटूने घुसवली रेल्वे स्थानकात कार