गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: ऍनाहीम , बुधवार, 26 जुलै 2017 (09:29 IST)

अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

भारताच्याच दोन खेळाडूंमध्ये पार पडलेल्या अत्यंत रंगतदार अंतिम लढतीत बाजी मारताना द्वितीय मानांकित एचएस प्रणयने अमेरिकन ओपन ग्रां प्री बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. दुखापतीतून सावरलेल्या प्रणयने तब्बल 21 महिन्यांनंतर ग्रां प्री स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या पारुपल्ली कश्‍यपची कडवी झुंज 21-15, 20-22, 21-12 अशी मोडून काढली. ही लढत एक तास पाच मिनिटे रंगली.