Korea Open पीव्ही सिंधू-किदाम्बी श्रीकांत उपांत्य फेरीत पोहोचले
भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि किदाबी श्रीकांत यांनी दक्षिण कोरियाच्या सॅन्चॉन येथे खेळल्या जात असलेल्या कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जगातील तिसरे मानांकित आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूने हा सामना 21-10, 21-16 अशा फरकाने जिंकला. 2022 मधील भारतीय शटलरचा हा 17 वा विजय आहे. उपांत्य फेरीत तिचा सामना सायना कावाकामी आणि अन सेओंग यांच्यातील विजेत्याशी होईल.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दोन माजी नंबर वन खेळाडूंमध्ये सामना झाला. ज्यामध्ये भारताचा शटलर श्रीकांत बाजी मारण्यात यशस्वी ठरला. या उपांत्यपूर्व फेरीत त्याने कोरियाच्या सोन वान होचा 21-12, 18-12, 21-12 असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना तासाभराहून अधिक काळ चालला. कोरियन खेळाडूविरुद्ध श्रीकांतचा 4-7 असा विक्रम होता. या खेळाडूकडून श्रीकांतने मागील तीन सामने गमावले. मात्र शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटूने चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
उपांत्य फेरीत यांच्यासोबत सामना होईल
जगातील पाचव्या मानांकित भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतचा उपांत्य फेरीत आठव्या मानांकित थायलंडच्या कुनलावत विटिडसर्न आणि इंडोनेशियाचा तृतीय मानांकित जोनाथन क्रिस्टी यांच्यातील विजेत्याशी सामना होईल.