शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:29 IST)

सिंधूला स्पोर्टस इलस्ट्रेटेडचा सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कार

रिओ ऑलिम्पिकमधली भारताची रौप्यविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला स्पोर्टस इलस्ट्रेटेडचा सर्वोत्तम क्रीडापटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्पोर्टस इलस्ट्रेटेड या नियतकालिकाचा क्रीडा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला.
 

पी. व्ही. सिंधू ही सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्काराची मानकरी ठरलीच, पण तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाही यंदाचे सर्वोत्तम प्रशिक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे सिंधू आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या हस्ते गोपीचंद यांचा गौरव करण्यात आला.