शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (15:19 IST)

राफेल नदालने टेनिस जगतात इतिहास रचला, हे दोन मोठे विक्रम केले

स्पॅनिश दिग्गज राफेल नदालने मेलबर्नमधील रॉडर लेव्हर एरिना येथे इतिहास रचला. 21 ग्रँडस्लॅम जिंकणारे ते जगातील पहिले  पुरुष खेळाडू ठरले. रविवारी खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2022 च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला. अगदी मेदवेदेवने पहिले दोन सेट जिंकले, पण राफेल नदालने पुढचे तीन सेट जिंकून इतिहास रचला. या सामन्यात राफेल नदालनेही अनेक विक्रम केले. 
 
सर्वप्रथम, पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे  ते पहिले  खेळाडू ठरले आहे. आतापर्यंत ते संयुक्त प्रथम होते, कारण त्यांच्या व्यतिरिक्त रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांनी 20-20 ग्रँडस्लॅम जिंकले होते. याशिवाय राफेल नदालचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी 2009 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. यासह चारही ग्रँडस्लॅम किमान दोनदा जिंकणारे स्पेनचे नदाल हे चौथे खेळाडू ठरले  आहे. 
 
राफेल नदालने 5 तास 20 मिनिटांपेक्षा जास्त चाललेल्या ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पहिले दोन सेट 2-6, 6-7 असे गमावल्यानंतर डॅनिल मेदवेदेवचा 6-4, 6-4 आणि 7-5 असा पराभव केला. 35 वर्षीय राफेल नदालचे हे दुसरे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद आहे. यासाठी त्यांनी 13 वर्षे वाट पाहिली. 2009 मध्ये त्याने शेवटचे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये या स्पॅनिश खेळाडूने जिंकलेले हे एकमेव ग्रँडस्लॅम आहे.