दुहेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन व पुरव राजा यांना विजेतेपद

single winner
पुणे| Last Modified सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (10:30 IST)
एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये विजेतेपदासाठीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित ऑस्ट्रेलीयाच्या जेम्स डकवर्थने ग्रेट ब्रिटनच्या पाचव्या मानांकित जे क्लार्क याचा पराभव करत एकेरी गटाचे विजेतेपद संपादन केले.

दुहेरी गटात भारताच्या रामकुमार रामनाथन व पुरव राजा या जोडीने भारताच्याच अर्जुन कढे व साकेत मायनेनी या जोडीचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित २७ वर्षीय ऑस्ट्रेलीयाच्या जेम्स डकवर्थने ग्रेट ब्रिटनच्या
जागतिक क्रमांक १८७ व स्पर्धेतील पाचव्या मानांकित जे क्लार्क याचा २ तास १८ मिनिट चाललेल्या सामन्यात ४-६, ६-४,६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. पाच शस्त्रक्रियांना सामोरे गेल्यानंतर १८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर डकवर्थने हे यश संपादन केले आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर डकवर्थने ८२व्या स्थानासह जागतिक अव्वल १०० मध्ये आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. यामुळे त्याचे ऑस्ट्रेलीयन ओपनच्या मुख्य फेरीतीन स्थान निश्चित झाले आहे.

दुहेरीत विजेतेपदासाठीच्या लढतीत भारताच्या दोन्ही जोड्या समोरासमोर होत्या. यात रामकुमार रामनाथन व पुरव राजा या जोडीने अर्जुन कढे व साकेत मायनेनी या तिसऱ्या मानांकित जोडीचा ७-६(३), ६-३ असा टायब्रेकमध्ये पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

केपीआयटी पुरुष चॅलेंजर एकेरीतील विजेत्या खेळाडूला ७२०० डॉलर्स (५,१0,000 रुपये) आणि ८0 एटीपी गुण तर, उपविजेत्यास ४२४० डॉलर्स (३,00,000 रुपये) व ४८ एटीपी गुण. दुहेरीतील विजेत्या जोडीला ३१०० डॉलर्स आणि ८० एटीपी गुण तर, उपविजेत्या जोडीला १८०० व ४८ एटीपी गुण अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एमएसएलटीएचे
अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर, नूतनीक्सचे व्यवस्थापकीय संचालक ए. बालकृष्णन, एमएसएलटीएचे
उपअध्यक्ष
प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, स्पर्धा सुपरवायजर
रोलँड हर्फेल,
एटीपी रेफ्री शीतल अय्यर, पीएमडीटीएचे
उपअध्यक्ष उमेश माने पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, आदी मान्यवर उपस्थित होते.

ऐकेरी गट- उपांत्य
फेरी
जेम्स डकवर्थ(2)(ऑस्ट्रेलीया) वि वि जे क्लार्क(5)(ग्रेट ब्रिटन) ४-६, ६-४,६-४

दुहेरी गट- उपांत्य फेरी
रामकुमार रामनाथन(भारत)/पुरव राजा(भारत) वि वि अर्जुन कढे(भारत)/साकेत मायनेनी(भारत)(3)७-६(३), ६-३
- अभिजित देशमुख


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...
विमानात आपण अनेकदा प्रवास केलाच असणार. विमानात प्रवेश करताच काही देखण्या मुली हसून ...

'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम

'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम
'नाणार' प्रकल्पासंबंधीची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि ...

केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली

केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली
केंद्र सरकारने रस्ते विकासाच्या योजनांचा निधी न दिल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय ...

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे ...

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे कराल एक्टिवेट
प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook)ने आपल्या लाइट व्हर्जन (Facebook Lite)च्या ...

काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये में महादेवासाठी रिर्झव्ह ...

काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये में महादेवासाठी रिर्झव्ह सीटमुळे वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीहून 'काशी-महाकाल एक्स्प्रेस' रवाना केली. यात ...