शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 26 डिसेंबर 2016 (11:05 IST)

कुस्तीच्या प्रसारासाठी जीवनपट बनावा - साक्षी मलिक

sakshi malik
पारंपरिक खेळ कुस्तीचा प्रसार होणार असेल तर आपल्या जीवनावर आधारित चित्रपट बनावा असे रियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणार्‍या साक्षी मलिकला वाटते. प्रो-रेसलिंग लीगच्या 'दिल्ली सुल्तान' टीमचा लोगो अनावरण प्रसंगी साणी बोलत होती. ती दिल्ली सुल्तान टीमची कॅप्टन आहे. रोहतकची रहिवासी असलेली साक्षी म्हणाली, जर कोणी इच्छूक असेल आणि यामुळे कुस्तीचा जर प्रसार होणार असेल तर निश्चिपणे जीवनपट बनवू इच्छिते. हा चित्रपट तरुणांना प्रोत्साहन देऊ शकतो. साशी म्हणाली माझी भूमिका कोणी साकारावी याबद्दल आता माझ्याकडे कोणतेच नाव नाही. जर कोणी चित्रपट बनवणार असेल तर मला त्याचा आनंद होईल. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक जिंकणारी साक्षी मलिक भारताची पहिली महिला खेळाडू आहे.