शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (10:06 IST)

जागतिक अग्रस्थान सानियाकडे

महिला दुहेरीचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान भारताच्या सानिया मिर्झाने सलग दुसऱ्या वर्षी आपल्याकडे राखले आहे. मार्टिना हिंगिसच्या साथीने सिंगापूरला झालेल्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पध्रेत मात्र आपले जेतेपद टिकवण्यात ती अपयशी ठरली होती.
 
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत एकाटेरिना माकारोव्हा आणि एलिना व्हेस्नीना जोडीने सानिया-मार्टिनाचा पराभव केला होता. मग एकाटेरियाना-एरिना जोडीने बेथानी मॅटके-सँडस आणि ल्युसी सॅफारोव्हा जोडीला हरवून विजेतेपद काबीज केले.
 
या यशाबद्दल सानिया म्हणाली, ‘‘सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थान माझ्याकडे राहणे ही गौरवास्पद गोष्ट आहे. माझ्यासाठी हा प्रवास संस्मरणीय असाच होता. त्यामुळे मी अतिशय आनंदित आहे.’’
 
या वर्षी सानियाने मार्टिनाच्या साथीने ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली. मग बाबरेरा स्ट्रायकोव्हासोबत सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धा जिंकली. मग मार्टिनाने सानियाची साथ सोडली, परंतु डब्ल्यूटीए फायनल्सचे जेतेपद टिकवण्यासाठी त्या दोघी एकत्रित आल्या.