1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. sania mirza tennis academy

सानिया खेळाडू घडविणार!

हैदराबाद- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने लहानग्यांसाठी टेनिस अकादमी स्थापन केली आहे. तीन ते आठ वर्षांच्या लहना मुला- मुलींना ती टेनिसचे धडे देणार आहे. ज्युबिली हिल्स येथील तिच्या घराशेजारीच ही अकादमी स्थापन करण्यात आली आहे.
 
सानियाने कालच या अकादमीचे उद्घाटन केले आहे. देशात टेनिसपटू घडविणार्‍या संस्था नसल्याची खंत सानियाने वारंवार बोलून दा‍खविली आहे.
पुढील लेख
कांबळीची आता राजकारणात बॅटिंग