शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (14:18 IST)

Asian Games 2023: स्वस्तिक-चिरागचा सुवर्णभेद

chirag satwik
Twitter
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक पटकावले आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी या भारतीय जोडीने बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय जोडीने कोरियाच्या किम वँग आणि चोई सोल या जोडीचा21-18  आणि 21-16 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील बॅडमिंटनमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी भारताने बॅडमिंटनमध्ये एकेरी, दुहेरी, वैयक्तिक किंवा सांघिक स्पर्धेत कधीही सुवर्णपदक जिंकले नव्हते. म्हणजेच हे सुवर्णपदक खास आहे. 
 
भारतीय जोडीला पुरुष दुहेरीचे सुवर्ण जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागले. पहिल्या गेममध्ये एके काळी सात्विक-चिराग कोरियन जोडीपेक्षा पिछाडीवर होती पण दोघांनी जोरदार पुनरागमन करत गुणसंख्या 13-13 अशी बरोबरी केली. यानंतर भारतीय जोडीने मागे वळून पाहिले नाही आणि पहिला गेम 21-18 असा जिंकला.
 
दुसऱ्या सेटमध्येही सात्विक-चिराग या भारतीय जोडीने क्रॉस कोर्टवर शानदार खेळ केला. कोरियन जोडीने पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न केले आणि नेटमध्ये गुणही मिळवले. पण भारतीय जोडीने संयम गमावला नाही आणि आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत दुसरा गेम  21-16 असा जिंकून सामन्यासह सुवर्णपदक पटकावले.
 
सात्विक-चिराग जोडीने मागील दोन्ही सामन्यांमध्ये कोरियन जोडी चोई सोल-किम वोंगचा पराभव केला होता. या वर्षी मलेशिया ओपनमध्ये भारतीय जोडीने कोरियन जोडीचा 21-16  आणि  21-13 असा पराभव केला होता आणि त्याआधी फ्रेंच ओपन 2022 मध्येही उपांत्य फेरीत 21-18, 21-14 ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.