सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: स्टुटगार्ट , शनिवार, 29 एप्रिल 2017 (08:34 IST)

शारापोव्हाचा स्टुटगार्ट खुली स्पर्धेत दुसरा विजय

उत्तेजकांच्या सेवनावरून १५ महिन्यांची शिक्षा भोगून आलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने स्टुटगार्ट खुल्या स्पर्धेत सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. शारापोव्हाने आपल्याच देशाची इकटेरिना मकरोवाचा १ तास २0 मिनिटे रंगलेल्या सामन्यात पराभव केला. ७-५ आणि ६-१ अशी सामन्याची आकडेवारी होती. मकरोवाने पहिल्या सेटमध्ये शारापोव्हाला झुंज दिली. मात्र दुसर्‍या सेटमध्ये मकरोवाचा खेळ कमी पडला. दरम्यान, शारापोव्हाने कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेची व्हीनस विल्यम्सला मातृत्व प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. प्रत्येक महिलेस जीवनात मिळालेली ही सवरेत्तम भेट आहे. तिच्या आयुष्यातील हा क्षण महत्त्वाचा आहे, असे शारापोव्हा शुभेच्छा देताना म्हणाली.