शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (10:14 IST)

Sudhir Win Gold: सुधीरने पॅरापॉवरलिफ्टिंगमध्ये पदक जिंकून इतिहास रचला

Sudhir Win Gold in Commonwealth Games 2022: पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला. त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकून मोठी कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण 6 सुवर्णपदके आहेत. सुधीरने 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. 
 
सुधीरने इतिहास घडवला 
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सुधीर हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 134.5 च्या विक्रमी स्कोअरसह 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. सुधीरला मात्र शेवटच्या प्रयत्नात 217 किलो वजन उचलण्यात अपयश आले. 
 
या खेळाडूंना रौप्यपदक मिळाले 
नायजेरियाच्या इकेचुकवू क्रिस्टियन उबिचुकवू याने 133.6 गुणांसह रौप्यपदक तर स्कॉटलंडच्या मिकी युलने 130.9 गुणांसह कांस्यपदक जिंकले. ख्रिश्चनने 197 किलो तर युलने 192 किलो वजन उचलले.