सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (09:11 IST)

Thomas Cup Badminton Tournament: टीम इंडिया 73 वर्षांनंतर प्रथमच फायनलमध्ये पोहोचली

badminton
भारतीय संघाने इतिहास रचला आहे. थायलंडमधील बँकॉक येथे खेळल्या जात असलेल्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेच्या 73 वर्षांच्या इतिहासात भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी हा संघ 1952, 1955 आणि1979 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता. टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कचा 3-2 असा पराभव केला.
 
भारताच्या विजयात किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. मात्र, लक्ष्य सेनला वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव स्वीकारावा लागला.