गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (09:13 IST)

‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ शेवटची शर्यत धावणार …

‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ अशी जगात ओळख असलेला धावपटू उसेन बोल्ट त्याच्या कारकीर्दीतील शेवटची शर्यत धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावून शेवट गोड करण्याचा बोल्टने  निर्णय घेतला आहे.
 
लंडनमध्ये आयएएफ (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन) तर्फे वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळवली जात आहे. या आठवड्यात होणाऱ्या शर्यतीत 30 वर्षीय बोल्ट उतरणार असून ही त्याच्या कारकीर्दीतील अखेरची शर्यत आहे. बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये दोन वैयक्तिक सुवर्णपदके जिंकून बोल्ट आजपर्यंत कधीच थांबला नाही. सहा ऑलिम्पिक गोल्ड आणि 11 विश्वविजेतेपदे आतापर्यंत बोल्टच्या नावावर जमा आहेत.
 
9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 100 मीटर, 200 मीटर आणि 4 X 100 मीटर रिले अशा प्रत्येक प्रकारात 2011, 2013 आणि 2015 अशी सलग तीन वर्ष त्याने सुवर्णपदकांची कमाई त्याने केली.  2012 च्या लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदकं कमावली आहेत. शेवटच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून कारकीर्दीची राजेशाही सांगता व्हावी, अशी त्याची इच्छा आहे.