1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. Vaishali Dalmiya insult national anthem

तृणमूलच्या आमदाराकडून राष्ट्रगीताचा अपमान

तृणमूल काँग्रेसच्या आमदार वैशाली दालमिया राष्ट्रगीतावेळी मोबाइलवर बोलत होत्या. वैशाली दालमियांकडून झालेला राष्ट्रगीताचा अपमान कॅमेर्‍यात कैद झाला आहे.
 
एक क्रीडा स्पर्धेदरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना वैशाली दालमिया मोबाइलवर बोलण्यात मग्न होत्या. वैशाली या बीसीसीआय आणि आयसीसीचे दिवंगत माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या कन्या आहेत. वैशाली दालमिया यांच्या कुटुंबाने क्रीडा जगतात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
 
मात्र, वैशाली एका फुटबॉल स्पर्धेदरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना सतत मोबाइल बोलताना दिसत होत्या. वैशाली कमिशनर कपच्या एका सामन्यादरम्यान उपस्थित होत्या.