सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 19 मे 2017 (10:53 IST)

मी येथेच थांबणारा कुस्तीपटू नाही - बजरंग पुनिया

आशियाई सुवर्णपदकावर समाधान मानणारा मी कुस्तीपटू नाही. मला जागतिक स्पर्धेतील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल यश मिळवायचे आहे. त्यादृष्टीनेच आशियाई सुवर्णपद माझ्यासाठी प्रेरणादायक आहे, असे कुस्तीगिर बजरंग पुनियाने सांगितले. त्याने नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळविले. 
 
दुखापतीमुळे बजरंगला बरेच महिने स्पर्धात्मक कुस्तीपासून दूर रहावे लागले होते. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत त्याने भारताला एकमेव सुवर्णपदक जिंकून दिले. याबाबत तो म्हणाला, आशियाई अजिंक्यवीर झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.