Women's World Boxing Championships: निखत, नीतू, लोव्हलिना आणि स्वीटी अंतिम फेरीत
महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. निखत जरीन, नीतू घनघास, लोव्हलिना बोर्गोनहेन आणि स्वीटी बोहरा यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 50 किलो वजनी गटात निखत जरीनने उपांत्य फेरीत कोलंबियाच्या इंग्रिड व्हॅलेन्सियाचा पराभव केला. दुसरीकडे नीतू घनघासने कझाकिस्तानच्या अलुआ बाल्किबेकोवाचा पराभव केला. लोव्हलिनाने 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली कुआनचा पराभव केला. स्वीटीने 81किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या एम्मा ग्रीनटीचा पराभव केला.
निखत, लोव्हलिना नीतू आणि स्वीटीने अंतिम फेरीत स्थान मिळवून किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. नीतू घनघास 48 किलो, निखत जरीन 50 किलो, लोव्हलिना बोरगोनहेन 75 किलो आणि स्वीटी बुरा 81 किलोमध्ये स्पर्धा करत आहे.
या सामन्यात तिला चीनच्या यू वूकडून पराभव पत्करावा लागला आणि ती स्पर्धेतून बाहेर पडली. तर 2022 कांस्यपदक विजेती मनीषा मौनला 57 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या अमिना झिदानीकडून पराभव पत्करावा लागला. जास्मिनला 60 किलो वजनी गटात कोलंबियाच्या पाओलो वाल्डेझकडून पराभव पत्करावा लागला, तर 81 किलोपेक्षा जास्त गटात नूपूरला कझाकिस्तानच्या लज्जत कुंगेबायेवाकडून 4-3 ने पराभूत व्हावे लागले. हे सर्वजण बाजी मारून स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर नुपूरला 81किलोपेक्षा जास्त वजन गटात कझाकिस्तानच्या लज्जत कुंगेबायेवाने 4-3 ने पराभूत केले. हे सर्वजण बाजी मारून स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Edited By - Priya Dixit