गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (16:22 IST)

World Wrestling Championships: कुस्तीपटू बजरंग पुनिया उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

bajrang puniya
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकणारा भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया शनिवारी बेलग्रेड, सर्बिया येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. त्याचवेळी 74 किलो वजनी गटात सागर जगलान कांस्यपदकासाठी आव्हान असणार आहे.
 
65 किलो वजनी गटातील शेवटच्या आठ सामन्यात ऑलिम्पिक कांस्य आणि दोन राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकणाऱ्या बजरंगला अमेरिकेच्या यियान्नी डायकोमिहलिसने तांत्रिक श्रेष्ठतेवर 10-0 ने पराभूत केले. आता अमेरिकन कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचला तर बजरंगला रेपेचेजमध्ये कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळू शकते.
 
यापूर्वी, 28 वर्षीय बजरंगने क्यूबाच्या अलेजांद्रो एनरिक वेड्स टोबियरचा 5-4 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. 18 वर्षीय जगलानने कांस्यपदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. त्याने मंगोलियाच्या सुलदखू ओलोनबायरचा7-3 असा पराभव केला. कांस्यपदकासाठी त्याची लढत इराणच्या योनेस अलियाकबरशी होणार आहे. 97 किलो गटात विकी स्वित्झर्लंडच्या सॅम्युअलकडून पराभूत होऊन पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला आणि 91 किलो गटात पंकजला कझाकिस्तानच्या एसिल एटकीनकडून पराभव पत्करावा लागला.