गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

प्रशिक्षणात दोष नाही: युकी

नवी दिल्ली- मी घेत असलेल्या प्रशिक्षणाच्या पद्धतीत कुठलीही त्रुटी नाही. या त्रुटी हे माझ्या दुखापतींचे कारण नाही. प्रशिक्षणातील चुकीचा फटाका माझ्या कारकिर्दीला बसलेला नाही, असे स्पष्टीकरण भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने दिले आहे. सात एप्रिलपासून डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीतील उझबेकिस्तानविरूद्धच्या सामन्याला बेंगळुरूत सुरूवात होणार आहे.
 
गुडघ्याच्या दुखापतीमुळे युकी या सामन्यात खेळू शकणार नाही. युकीने ज्युनिअर स्तरावर उत्तम कामगिरी करून अव्वल स्थान पटकावले होते. त्यामुळे वरिष्ठ गटातही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करेल, अशी टेनिस रसिकांना अपेक्षा होती, पण सततच्या दुखापतींमुळे त्याला मनासारखा खेळ करता आलेला नाही.