शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By राकेश रासकर|

अमिताभ बच्चन

अभिनयाचा आणि लोकप्रियतेचाही शहेनशाह

पूर्ण नाव : अमिताभ हरिवंशराय बच्च
जन्म : 11 ऑक्टोबर 1942
जन्म ठिकाण : अलाहाबाद उत्तर प्रदेश
पदार्पण : सात हिंदूस्तानी १९६९

शरीरयष्टी किडकिडीत. दिसणेही सामान्य, लक्षात रहावे असे एकच वैशिष्ट्य. ताडमाड उंची. या बळावर चित्रपटासारख्या क्षेत्रात य़शस्वी होणे म्हणजे अशक्य. पण ते घडले, कारण हेच वर्णन असणार्‍या या देहात काही लक्ष वेधून घेणार्‍या आणखीही काही बाबी आहेत. आवाज नि अभिनय. केवळ या दोघांच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन नावाचे मिथक राज्य करते आहे. शहेनशहा, एँग्री यंग मॅन, बिग बी नि अशी अनेक टोपण नावे या मिथकाला आहेत. वयाची 60 ओलांडली तरी या नावाचा करिश्मा आजही कायम आहे.

या संघर्षालाही अर्थात इतिहास आहेच. डॉ. हरिवंशराय बच्चन या प्रसिद्ध कवींचा अमिताभ हा मुलगा. अलाहाबादलाच त्याचे शालेय शिक्षण झाले. शास्त्रशाखेत पदवी घेतल्यानंतर त्याने एका खासगी कंपनीत सहा वर्षे नोकरीही केली. नंतर चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत आला. सात हिन्दुस्तानी (१९६९) हा त्याचा पहिला चित्रपट साफ आपटला. अमिताभ कुणाच्या लक्षातही आला नाही. मधल्या काळात त्याने बरेच चित्रपट केले. पण 1971 मध्ये आलेल्या आनंद चित्रपटाने त्याला ओळख दिली. त्याला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पण तरीही त्याची कारकिर्द बहरू शकली नाही. त्यासाठी 1973 मध्ये त्याची मुख्य भूमिका असलेला जंजीर चित्रपट यावा लागला.

जंजीरमधील त्याच्या पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेमुळे त्याला 'एँग्री यंग मँन' असे बिरूद मिळाले. पोलिस स्टेशनमध्ये टेबलावर पाय ठेवून बसणार्‍या प्राणला ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं असे सांगणार्‍या अमिताभमधील अंगार लोकांना प्रचंड भावला. अमिताभच्या लोकप्रियतेला त्या काळचे वातावरणही कारणीभूत आहे. बेकारी, महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्यांना याविरूद्ध आवाज उठविणार्‍याची गरज होती. त्यांच्यातील चीड अमिताभने पडद्यावर व्यक्त केली. त्यामुळे श्रीमंतांना नमविणारा, गुंड व मस्तवालांना वठणीवर आणणारा अमिताभ प्रचंड य़शस्वी ठरला. त्यानंतर प्रसिद्धी, यश, पैसा या सार्‍या बाबी त्याच्या पायाशी येऊन पडल्या. त्यानंतर आलेल्या शोलेने तर इतिहास घ़डविला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला शोलेने त्याची ओळख दिली. आतापर्यंतचा सर्वाधिक चाललेला, सर्वांत प्रभावशाली ठरलेला चित्रपट शोले ठरला. यानंतर मग अमिताभयुगच सुरू झाले. अमिताभची जोडी प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई यांच्याबरोबर चांगली जमली. त्याचे शराबी, अमर अकबर अ‍ॅथनी, डॉन, दीवार, त्रिशूल हे चित्रपट गाजले. त्याचवेळी सिलसिला, अभिमान, कभी कभी असे वेगळ्या वाटेचे चित्रपटही आले. 1983 मध्ये कुलीच्या चित्रिकरणादरम्यान त्याला अपघात झाला. त्यावेळी तो वाचावा म्हणून संपूर्ण देशभर सर्वधर्मियांनी प्रार्थना केल्या होत्या. अमिताभच्या लोकप्रियतेचे हे एक उदाहरण.

बच्चन व गांधी कुटुंबीयांचे संबंध खूप जवळचे होते. राजीव गांधी व अमिताभची मैत्री होती. इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतरच्या निवडणूकीत कॉंग्रेसने त्याला लोकसभेसाठी उमेदवारी दिली. यात तो ज्येष्ठ नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून निवडून आला. मात्र, बोफोर्सच्या कथित गैरव्यवहारात त्याच्यावर आरोप झाल्यानंतर त्याने खासदारकीचा राजीनामा दिला. या काळात आलेले त्याचे जादूगर, अजूबा, हम, तुफान या सारखे चित्रपट आपटले. मग त्याने विश्रांती घेण्याचे ठरविले. मधल्या काळात त्याने एबीसीएल कापोर्रेशन नावाची कंपनीही काढली. परंतु, ती दिवाळखोरीत निघाली. या काळात अमिताभ संपला अशीच स्थिती होती.

पण अमिताभ फिनिक्स पक्ष्यासारखा स्वतःच्या राखेतून उडणारा पक्षी आहे, हे कळायला अखेर 2000 साल उजाडावे लागले. स्टार टिव्हीच्या कौन बनेगा करोडपती या मालिकेतून अमिताभने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत मोठा धोका पत्करला. पण ही चाल यशस्वी ठरली. हॉटसीटवर बसून समोरच्याला प्रश्न विचारणारा अमिताभ लोकांना भयंकर आवडा. आणि त्याची सेकंड इनिंग जोमाने सुरू झाली. अमिताभ संपला असे म्हणणाऱ्या टीकाकारांना त्याने योग्य उत्तर दिले.

2001 मध्ये आलेली कभी खुशी कभी गम ने त्याला त्याचे गतवैभव मिळवून दिले. नंतर अक्स, कांटे, अरमान, लक्ष्य, दीवार, बुम यातील काही चित्रपट यशस्वी ठरले. खरे यश बागबान या कौटुंबिक चित्रपटाला मिळाले. अमिताभच्या अभिनयप्रतिभेचा प्रत्यय ब्लॅक चित्रपटातून आला. यात एका मूकबधीर, अपंग मुलीला शिकविणाऱ्या शिक्षकाची अप्रतिम भूमिका अमिताभने केली. या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यानंतर आलेल्या बंटी और बबलीमध्ये अमिताभ व त्यांचा मुलगा अभिषेक दोघांनी प्रथमच एकत्र काम केले. राम गोपाल वर्मा व अमिताभ हे दोघे सरकारच्या निमित्ताने एकत्र आले. प्रसिद्धीपूर्वीच हीट ठरलेला हा चित्रपटही प्रचंड गाजला. अमिताभच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून यावा.

सेकंड इनिंगमध्ये त्याने केलेल्या चित्रपटात बरेच वैविध्य आहे. निशब्द मध्ये त्याने सतरा वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या वृद्धाची भूमिका आहे. काहीशी अशीच भूमिका नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चीनी कम मध्ये आहे. रिश्तामध्ये मुलाची काळजी घेणारा बाप आहे. तर बंटी और बबलीमध्ये चोरांच्या मागावर असणारा पोलिस इन्स्पेक्टर आहे. अक्समध्ये विक्षिप्त पती आहे. तर विरूद्धमध्ये व्यवस्थेविरूद्ध आवाज उठविणारा बाप दाखविला आहे.


अमिताभ चित्रपटात जेवढा व्यस्त आहे, तेवढाच जाहिरातीतही आहे. छोट्या पडद्यावर सर्वाधिक जाहिराती त्याच्या असतात. लोकप्रियतेच्या क्रमवारीत एक ते दहा क्रमांक पूर्वी अमिताभसाठी राखून ठेवलेले असायचे. आजही परिस्थिती काही फार वेगळी नाही. चित्रपट, जाहिराती या सगळ्या क्षेत्रात अजूनही अमिताभ हा ब्रॅंड चांगलाच चालतो आहे.

अमिताभला मिळालेले पुरस्कार
अग्निपथ व ब्लॅक या चित्रपटासाठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शिवाय आतापर्यंत 14 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्याने अनेक आयफा, झी सिने, स्टार स्किन, स्टार्डस, सँनसुई पुरस्कार ‍मिळवले आहेत. केंद्र सरकारने त्याचा पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार देऊनही त्याला गौरविले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित केले आहे.

अमिताभचे चित्रप
झुम बराबर झुम (2007 आगामी)
राम गोपाल वर्मा के शोले (2007 आगामी)
सरकार 2 (2007 आगामी)
चीनी कम (2007)
शूटआउट एट लोखंडवाला (2007)
स्ट्रगलर (2007)
जमानत (2007)
निशब्द (2007)
एकलव्य (2007)
बाबूल (2006)
कभी अलविदा ना कहना (2006)
डरना जरूरी है (2006)
गंगा (2006)
फॅमिली (2006)
एक अजनबी (2005)
दिल जो भी कहे (2005)
विरूध्द (2005)
बंटी और बबली (2005)
पहेली (2005)
वक्त (2005)
सरकार (2005)
ब्लॅक (2005)
देव (2004)
अब तुम्हारे वतन साथियो (2004)
लक्ष्च (2004)
ख़ाकी (2004)
बागबान (2003)
बूम (2003)
अरमान (2003)
आँखे (2002)
काटे (2002)
अग्निवर्षा (2002)
हम किसीसे कम नही (2002)
कभी खुशी कभी गम (2001)
अक्स (2001)
एक रिश्ता (2001)
मोहब्बत्ते (2000)
कोहराम (1999)
ऐ वतन तेरे लिए १९९९
घात १९९९
हिन्दुस्तान की कसम १९९९
कोहराम १९९९
लाल बादशाह १९९९
मोहब्बतें १९९९
रिश्ता १९९९
सूर्यवंशम्‌ १९९९
तुम्हारे लिए १९९९
मेजरसाब १९९८
बड़े मियाँ छोटे मियाँ १९९८
मृत्युदाता १९९७
घातक १९९६
इन्सानियत १९९४
खुदा गवाह १९९२
अजूबा १९९१
हम १९९१
अकेला १९९१
इंद्रजीत १९९१
आज का अर्जुन १९९०
क्रोध १९९०
अग्निपथ १९९०
तूफान १९८९
गंगा जमुना सरस्वती १९८९
जादूगर १९८९
मैं आजाद हूँ १९८९
शहंशाह १९८८
सूरमा भोपाली १९८८
कौन जीता कौन हारा १९८७
आखरी रास्ता १९८६
जलवा १९८६
अमीर आदमी गरीब आदमी १९८५
गिरफ्तार १९८५
मर्द १९८५
शराबी १९८४
इन्कलाब १९८४
पेट प्यार और पाप १९८४
कुली १९८३
पुकार १९८३
अंधा कानून १९८३
महान १९८३
याराना १९८२
बेमिसाल १९८२
खुद्दार १९८२
देशप्रेमी १९८२
नमक हलाल १९८२
सत्ते पे सत्ता १९८२
शक्ति १९८२
सिलसिला १९८२
याराना १९८२
कालिया १९८१
मंजिल १९८१
चश्मेबद्दूर १९८१
लावारिस १९८१
नसीब १९८१
मंजिल १९८१
नास्तिक १९८१
राम बलराम १९८०
द ग्रेट गैम्बलर १९८०
अदालत १९८०
अनुसंधान (बंगाली) १९८०
बरसात की एक रात १९८०
दो और दो पाँच १९८०
दोस्ताना १९८०
शान १९८०
गोलमाल १९७९
जुर्माना १९७९
काला पत्थर १९७९
मि. नटवरलाल १९७९
सुहाग १९७९
बेशर्म १९७८
गंगा की सौगंध १९७८
डॉन १९७८
कस्मे वादे १९७८
मुकद्दर का सिकंदर १९७८
त्रिशूल १९७८
अमर अकबर एंथोनी १९७७
खून पसीना १९७७
आलाप १९७७
इमान धरम १९७७
परवरिश १९७७
अदालत १९७७
अमर अकबर अंॅथोनी १९७७
दो अनजाने १९७६
कभी कभी १९७६
मिली १९७५
जमीर १९७५
चुपके चुपके १९७५
दीवार १९७५
फरार १९७५
हेरा फेरी १९७५
शोले १९७५
बेनाम १९७४
कसौटी १९७४
कुँवारा बाप १९७४
मजबूर १९७४
रोटी कपड़ा और मकान १९७४
गहरी चाल १९७३
नमक हराम १९७३
सौदागर १९७३
जंजीर १९७३
अभिमान १९७३
गहरी चाल १९७३
रास्ते का पत्थर १९७२
बँधे हाथ १९७२
बॉम्बे टू गोवा १९७२
रास्ते का पत्थर १९७२
बंसी बिरजू १९७२
एक नजर १९७२
संजोग १९७२
आनंद १९७१
परवाना १९७१
रेशमा और शेरा १९७१
गुड्डी १९७१
प्यार की कहानी १९७१
सात हिंदूस्तानी १९६९