श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय ॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी निर्गुणा । जयजयाजी सनातना । जयजयाजी अघहरणा । लोकपाला सर्वेशा ॥१॥ आपुल्या कृपेकरोन । अल्प वर्णिले आपुले गुण । श्रोती द्यावे अवधान । श्रवणी आदर धरावा ॥२॥ अक्कलेकोटी मालोजी नृपती । समर्थचरणी जयाची भक्ति । स्वहस्ते सेवा नित्य करिती...