गुरू हर राय साहेब हे शीख धर्माचे सातवे गुरू होय. बाबा गुरदित्यजी व माता निहाल कौर यांचे ते सुपूत्र होत. वयाच्या चौदाव्या वर्षी मार्च १६४४ मध्ये त्यांना गादी सोपविण्यात आली.
गुरू हर राय साहेब यांचा विवाह माता कृष्ण कौरजी यांच्याशी झाला. त्यांना दोन पुत्र होते. गुरू हर राय साहेब यांनी शीख धर्मियांत लष्करी जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णूतेचा फटका त्यांना बसला. गुरू हर राय यांनी हर किशन यांना आपला उत्तराधिकारी नेमले. ऑक्टोबर १६६१ मध्ये गुरू हर राय यांची प्राणज्योत मालवली.