शीख धर्मात एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक देव. त्यांच्यानंतर एकूण नऊ गुरू झाले. प्रत्येक गुरूने आधीच्या गुरूंनी दिलेल्या शिकवणीत भर घालून लोकांना उपदेश केला.
दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की, माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबालाच गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. अशाप्रकारे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली.
शीख धर्मातील दहा गुरू-
गुरू नानकदेव गुरू अंगददेव गुरू अमरदेव गुरू रामदास गुरू अर्जुनदेव गुरू हरगोबिंद गुरू हरराय गुरू हरकृष्ण गुरू तेगबहादूर गुरू गोविंदसिंग