शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2021-22
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (12:11 IST)

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. रेल्वेच्या सेवा सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद केली आहे. यात योजनेुसार २०३० पर्यंत विकास केला जाणार आहे. बजेटमध्ये सीताराम यांनी रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी १.१५ लाख कोटींची तरतूद जाहीर केली. 
 
करोना व्हायरस महामारी दरम्यान कठोर टाळेबंदीचा फटका रेल्वे सेवेला बसला. प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती तरी माल वाहतुकीतून रेल्वेला तारले. गेल्या सहा महिन्यात देशांतर्गत माल वाहतुकीतून रेल्वेने कमाई केली. मात्र गेल्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे पूर्ण कारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. लॉकडाऊनमध्ये वाहतूक ठप्प असल्याने ही विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात रेल्वेला यश आले. 
 
 
तसेच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी, नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटींची तरतूद, नागपूर फेज २ आणि नाशिक मेट्रोसाठीही निधीची तरतूद तर मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.