मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वेबदुनिया|
Last Modified: न्‍यूयॉर्क , मंगळवार, 20 जानेवारी 2009 (09:07 IST)

बराक ओबामा यांचा आज शपथविधी

तमाम अमेरिकन नागरिकांच्‍या अपेक्षांचे ओझे घेऊन सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेले नवनिर्वाचित राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा आज (दि.20) अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदाची शपथ घेत आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजेच्‍या सुमारास तर अमेरिकेत दिवसाच्‍या सुरुवातीला ते आपल्‍या पदाची सुत्रे हातात घेणार आहेत. यासाठी मोठी तयारी करण्‍यात आली असून हा सोहळा सर्वांना प्रत्‍यक्ष पाहता यावा यासाठी प्रथमच तो सर्वसामान्‍यांसाठीही खुला करण्‍यात आला आहे. ओबामांकडून अमेरिकन जनतेला अनेक अपेक्षा असून ते अमेरिकेचा चेहरामोहराच बदलवून टाकतील अशी धारणा आहे.