ओबामांची सक्‍सेस टीम...

बुधवार,जानेवारी 21, 2009
अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांच्‍या मंत्रिमंडळास सिनेटने मंजुरी दिली असून त्‍यांच्‍या मंत्रिमंडळ असे असणार आहे. ओबामांच्‍या मंत्रिमंडळाने परराष्‍ट्र मंत्रालयासाठीचा हिलेरी क्लिंटन यांच्‍या पद वगळता सर्व पदांना आवाजी मतदानाने मंजुरी दिली ...
नेहमीच आपल्‍या पूर्ण नावाचा वापर टाळणा-या बराक ओबामा यांनी अमेरीकेच्‍या राष्ट्राध्‍यक्षपदाची शपथ घेताना अखेर बराक हुसैन ओबामा असे नाव उच्‍चारले आहे.
वर्ष 1789 मध्‍ये अमेरीकेचे पहिले राष्ट्राध्‍यक्ष जॉर्ज वॉशिंग्‍टन यांनी पदभार स्‍वीकारल्‍यापासून आजपर्यंत बराक ओबामा यांच्‍यापर्यंत जेवढ्या राष्ट्राध्‍यक्षांनी शपथ घेतली त्‍यांनी शपथविधीनंतर भाषण दिले. मात्र अमेरिकन राज्‍यघटनेनुसार भाषण देणे ...
ओबामा हे जगभरातील कोट्यवधी काळ्या लोकांसाठी आशा आणि अपेक्षांचा दिवस घेऊन येणारा नवा सुर्य असल्‍याचे मत दक्षिण आफ्रीकेचे माजी राष्ट्राध्‍यक्ष आणि अश्वेत क्रांतिचे प्रणेते नेल्सन मंडेला यांनी व्‍यकत केले आहे. अमेरिकेच्‍या 44 व्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदी ...
वॉशिंग्टन अमेरिकेतील राजसत्तेने मंगळवारी रात्री ऐतिहासिक कूस बदलली आणि इतिहास घडला. गौरवर्णीयांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बराक ओबामा या कृष्णवर्णीयाने अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
'येस वुई कॅन चेंज...' हा मुलमंत्र अमेरिकन जनतेला देत महाशक्‍तीच्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले बराक हुसैन ओबामा यांनी अमेरिकेचे 44 व्‍या राष्ट्राध्यक्षपदाची दि.20 रोजी शपथ घेतली. अब्राहम लिंकन यांच्‍या कार्यपध्‍दतीवर गाठ श्रध्‍दा ...
अमेरीकेत शपथ घेताना एखाद्या धर्म ग्रंथावर हात ठेवून शपथ धेतली पाहिजे अशी कुठलीही सक्‍ती नाही. मात्र तशी प्रथा आता रूढ झाली आहे.

शपथ केवळ 35 शब्‍दांची

मंगळवार,जानेवारी 20, 2009
''आय बराक ओबामा डू सोलेमली स्‍वेअर दॅट आय वील फेथफूली एक्‍झीक्‍युट द ऑफिस ऑफ प्रसिडेंट ऑफ दि युनायटेड स्‍टेट्स, एण्‍ड वील टू दि बेस्‍ट ऑफ माय एबिलीटी, प्रीसर्व्ह, प्रोटेक्ट एण्‍ड डिफेंड दि कॉन्‍स्‍टीट्युशन ऑफ दि युनायटेड स्‍टेटस्''
जर गेल्‍या अनेक वर्षांपासून अमेरिकेतील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असेल तर कोणीही स्‍वस्‍थ बसू शकत नाही. आपल्‍याला खंबीर आणि बलशाली जगाची निमिर्ती करायची आहे. आपण आपल्‍यातील मतभेद विसरून एकत्र येऊया असे आवाहन शपथविधी समारंभापूर्वी ...
राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांच्‍या या शपथविधी समारंभात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून त्‍यासाठी काही रस्ते तसेच मेट्रोचे रेल्वे स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे 20 लाख अमेरिकन नागरिक उपस्थित राहणार आहेत.

असा असेल शपथविधी कार्यक्रम

मंगळवार,जानेवारी 20, 2009
अमेरिकन इतिहासात चिरस्‍मरणीय राहणा-या दिवसाचा सूर्य अवघ्‍या काही तासात उगवणार असून देशाच्‍या सर्वोच्‍च पदावर पहिला अश्‍वेतवर्णीय राष्‍ट्राध्‍यक्ष म्‍हणून बराक ओबामा शपथ ग्रहण करणार आहेत. या ऐतिहासिक समारंभासाठी व्हाइट हाऊस सज्ज झाले आहे. देशाच्‍या ...
जॉन मेक्कन हे अद्वितीय देशभक्‍त असून एक साहसी व्‍यक्‍ती आहे, अशा शब्‍दात अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकन सीनेटर जॉन मेक्कन यांची स्‍तुती केली आहे.
टोकियो- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेझ जगभर पसरले आहे. त्यांच्या प्रभावी भाषणाने आता जपानी नागरिकांना इंग्रजी शिकण्याची आवड निर्माण झाली असून, त्यांचे आजचे भाषण ऐकण्यासाठी काही जणांनी खास इंग्रजी शिकण्याचा संकल्प केला आहे.
अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांच्‍या प्रशासकीय टीममध्‍ये भारतीय वंशाची प्रख्‍यात अमेरिकन वकील प्रीता बंसल यांचा समावेश करण्‍यात आला आहे. बजेट आणि नियोजन कार्यालयात जनरल काउन्सिल आणि वरिष्ठ सल्‍लागार म्‍हणून त्‍या काम करणार आहेत. सध्‍या ...
तमाम अमेरिकन नागरिकांच्‍या अपेक्षांचे ओझे घेऊन सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेले नवनिर्वाचित राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा आज (दि.20) अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदाची शपथ घेत आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजेच्‍या सुमारास तर अमेरिकेत ...

अमेरिकेत 'ओबामामॅनिया'

सोमवार,जानेवारी 19, 2009
वॉशिंग्टन बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेण्याला अवघे काही तास उरले असताना अमेरिकी जनतेत प्रचंड उत्साह दिसत आहे. हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय ठरावा यासाठी येथील नॅशनल मॉलमध्ये हॉलीवूड कलावंतांचा शानदार कार्यक्रम झाला.
वॉशिंग्टन, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांची लोकप्रियता टिपेला पोहोचली आहे. त्याचवेळी मावळते अध्यक्ष जॉर्ज बुश यांची लोकप्रियता वेगाने घसरणीला लागली आहे. माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात ओबामांची लोकप्रियता 79 टक्के असल्याचे लक्षात आले ...
अमेरिकन राष्ट्राध्‍यक्षपदाची शपथ घेत असलेल्‍या बराक ओबामा यांच्‍या समारंभात नॅशनल प्रेयर सर्व्‍हीसमध्‍ये एक हिंदू महिला पुरोहितही सहभागी होणार आहे.

ओबामांचा 'डुप्लिकेट'

सोमवार,जानेवारी 19, 2009
जाकार्ता इंडोनेशियातील 34 वर्षाचा इल्मम अदनान नावाचा छायाचित्रकार सध्या भलताच चर्चेत आहे. आणि का असू नये. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा आणि अदनानमध्ये दिसण्यात खूपच साम्य आहे. अदनान म्हणजे डिट्टो ओबामा आहे.
वॉशिंग्टन अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी शपथ घेतल्यानंतर न्यूयॉर्कमधील एका चर्चमध्ये साडेतीन तास घंटा वाजविण्यात येईल.