Last Modified: न्युयॉर्क , मंगळवार, 20 जानेवारी 2009 (15:22 IST)
मैक्कन अद्वितीय देशसेवकः ओबामा
जॉन मेक्कन हे अद्वितीय देशभक्त असून एक साहसी व्यक्ती आहे, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकन सीनेटर जॉन मेक्कन यांची स्तुती केली आहे.
व्हीएतनाम युद्धात माजी सैनिक असलेल्या आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत ओबामांचे विरोधक असलेल्या मैक्कन यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या रात्रीभोज कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की मैक्कन यांच्यात प्रगत विचार आणि प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता आहे. त्यांनी राजकीय संबंधांमध्ये अद्वितीय आणि नवीन विचार आत्मसात केले आहे.