मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वार्ता|

अखेर ओबामांनी नावात हुसैन लावले

नेहमीच आपल्‍या पूर्ण नावाचा वापर टाळणा-या बराक ओबामा यांनी अमेरीकेच्‍या राष्ट्राध्‍यक्षपदाची शपथ घेताना अखेर बराक हुसैन ओबामा असे नाव उच्‍चारले आहे.

कॅपिटल हिलमध्‍ये शपथ ग्रहण करीत असताना ओबामा यांना 44 व्‍या राष्ट्राध्‍यक्ष पदाची शपथ घेण्‍यासाठी बराक एच. ओबामा या नावाने आमंत्रित केले. मात्र त्‍यानंतर ओबामा यांनी शपथ घेताना 'आय बराक हुसैन ओबामा..' असा उच्‍चार केला. राष्ट्राध्‍यक्षपदाच्‍या प्रचारा दरम्‍यान मात्र त्यांनी या शब्‍दाचा उच्‍चार टाळला होता.

शपथ ग्रहण कार्यक्रमाच्‍या वेळी सुरूवातीला ओबामा थोड्यावेळासाठी अडखळले मात्र नंतर त्‍यांनी लगेच सावरून आपली शपथ पूर्ण केली.

शपथ विधी कार्यक्रमानंतर त्‍यांनी ओव्‍हल ऑफिसमध्‍ये नवे राष्ट्राध्‍यक्ष म्‍हणून आवश्यक कागदपत्रांवर डाव्‍या हाताने स्‍वाक्षरी केली.