जपानमध्ये ओबामांच्या पुस्तकांची धूम
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेझ जगभर पसरले आहे. त्यांच्या प्रभावी भाषणाने आता जपानी नागरिकांना इंग्रजी शिकण्याची आवड निर्माण झाली असून, त्यांचे आजचे भाषण ऐकण्यासाठी काही जणांनी खास इंग्रजी शिकण्याचा संकल्प केला आहे. जपानमध्ये सध्या 'द स्पीचेस ऑफ बराक ओबामा' हे ओबामांच्या भाषणावर आधारीत पुस्तक जपानमध्ये तुफान चालत असून, ओबामांच्या भाषणाने आपण प्रभावीत झाल्याचे अनेकांनी कबूल केले आहे. जपानी तज्ज्ञांच्या मते जपानमध्ये इंग्रजी पुस्तकांचा खप कमी असून, अशी मोजकीच पुस्तकं आहेत, जी इतकी प्रसिद्ध झाली आहेत. पुस्तकाचे प्रकाशक यामायोता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, ओबामांच्या या भाषणाच्या पुस्तकाची मागणी वाढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.