मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By भाषा|
Last Modified: न्‍युयॉर्क , बुधवार, 21 जानेवारी 2009 (17:01 IST)

ओबामांची सक्‍सेस टीम...

PR
अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांच्‍या मंत्रिमंडळास सिनेटने मंजुरी दिली असून त्‍यांच्‍या मंत्रिमंडळ असे असणार आहे. ओबामांच्‍या मंत्रिमंडळाने परराष्‍ट्र मंत्रालयासाठीचा हिलेरी क्लिंटन यांच्‍या पद वगळता सर्व पदांना आवाजी मतदानाने मंजुरी दिली आहे.

- हिलेरी क्लिंटन (परराष्‍ट्र मंत्री)
61 वर्षीय हिलेरी या अमेरीकेच्‍या माजी प्रथम महिला आहेत. राष्ट्राध्‍यक्ष पदाच्‍या शर्यतीतही त्‍या ओबामांच्‍या प्रतिस्‍पर्धीही होत्या. त्‍यांच्‍या पदास अद्याप मंजुरी मिळाली नसली तरीही त्‍यास चर्चेनंतर मंजुरी मिळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यांचे पती बिल क्लिंटन यांच्‍या फाऊंडेशनला मोठ्या प्रमाणावर मिळत असलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय मदतीवर एका सदस्‍याने चर्चा करण्‍याची मागणी केल्‍याने हा विषय तुर्तास बाळगळला आहे.

- रॉबर्ट गेट्स (संरक्षण मंत्री)
बुश यांच्‍या कार्यकाळातही संरक्षण मंत्री असलेल्‍या गेट्स यांना पुन्‍हा नियुक्‍त करण्‍यात आले आहे.

- टिमोथी गीथनर (अर्थमंत्री)
यापूर्वी न्युयॉर्कच्‍या केंद्रीय रिजर्व बँकेचे अध्यक्ष असलेले गीथनर 47 वर्षाचे असून त्‍यांची आर्थिक मंदीवर नियंत्रणासाठी स्‍तुती करण्‍यात येत आहे.

- टॉम डॅश्‍ले (आरोग्य मंत्री)
61 वर्षीय माजी हवाई दल अधिकारी डॅश्‍ले यांना आरोग्य मंत्रीपदाची शपथ देण्‍यात येणार आहे. डॅश्ले माजी सीनेटर आहेत.

- एरिक हॉल्डर (एटर्नी जनरल, कायदा मंत्री)
क्लिंटन यांच्‍या कार्यकाळात डेप्‍युटी अटर्नी जनरल असलेल्‍या एरिक ओबामा यांचे मुख्य सहायक आहेत.

- जेनेट नेपोलिटानो (गृहसुरक्षा मंत्री)
एरिजोनाच्या गव्‍हर्नर पदी असलेल्‍या जॅनेट देशाच्‍या सीमांचे रक्षण करण्‍यासाठी कटीबध्‍द आहेत.

- हिल्डा सॉलिस (श्रम मंत्री)
51 वर्षीय हिल्डा या स्टेट सीनेटमध्‍ये निवडून आलेल्‍या पहिल्‍या लॅटीन महिला आहेत.

- सुजेन राइस (संयुक्त राष्ट्र राजदूत)
44 वर्षीय राइस ओबामा यांच्‍या प्रचार अभियाना दरम्‍यान दौरान त्‍यांच्‍या परराष्‍ट्र धोरण सल्‍लागार होत्‍या. हे पद सांभाळणा-या त्‍या पहिल्‍या कृष्णवर्णीय महिला आहेत. क्लिंटन यांच्‍या काळातही त्‍या मंत्रिपदावर होत्या.

- स्टीवन चु (ऊर्जा मंत्री)
60 वर्षीय चीनी वंशाचे चु यांना 1997 मध्‍ये भौतिक विज्ञानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला असून त्‍यांना विज्ञान आणि संशोधन याविषयाचा चांगला अनुभव आहे.

- लिसा जॅक्सन (पर्यावरण मंत्री)
46 वर्षीय जॅक्सन न्यूजर्सीच्‍या माजी गव्‍हर्नर आणि कॅबिनेट सदस्य होत्‍या. पर्यावरण नियंत्रक म्‍हणून त्‍यांना 20 वर्षांचा अनुभव आहे.

- शॉन डोनोवन (गृहनिर्माण मंत्री)
42 वर्षीय जोनोवन हे क्लिंटन यांच्‍या कार्यकाळात कार्यवाहक गृहनिर्माण आयुक्त होते. स्‍वस्‍त गृहनिर्मिती विषयाचा त्‍यांना चांगला अनुभव आहे.

- आर्ने डंकन (शिक्षा मंत्री)
डंकन हे सात वर्षांपर्यंत शिकागो पब्लिक स्कूलचे प्रमुख होते. डंकन ओबामा यांचे बास्केट बॉल खेळातील साथीदारही होते.

- केन सालाजर (गृह मंत्री)
53 वर्षीय सालाजर शांत स्‍वभावाचे असून त्‍यांनी जल आणि पर्यावरण कायद्यांचा अभ्‍यास केला आहे.

- टॉम विल्सैक (कृषि मंत्री)
58 वर्षीय विल्सेक दोन वेळा लोवा प्रांताचे गव्‍हर्नर होते. अक्षय ऊर्जा विषयाचे ते पक्के समर्थक आहेत.

- लिओन पेनेटा (सीआयए संचालक)
सीआयए संचालक पदावर निवडल्‍या गेलेल्‍या पेनेटा यांच्‍या निवडीवर सर्वांना शंका असून योग्‍यता असली तरी त्‍यांच्‍यात अनुभवाची कमतरता आहे.

- संजय गुप्ता (सर्जन जनरल)
39 वर्षीय संजय न्युरोसर्जन असून त्‍यांचे 'चेजिंग लाइफ' हे पुस्‍तक प्रचंड प्रसिध्‍द आहे. ते भारतीय वंशाचे आहेत.