शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वेबदुनिया|

व्‍हाईट हाऊसवर 'ओबामा' राज

एका कृष्‍णवर्णीयाने घडविला इतिहास

PR
अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत बराक ओबामा यांनी इतिहास घडविला असून या महासत्तेचा 44 वा राष्‍ट्राध्‍यक्ष होण्‍याचा मान त्‍यांनी पटकाविला आहे. आपले कट्टर प्रतिस्‍पर्धी रिपब्लिकन पक्षाचे जॉन मेक्‍कन यांचा पराभव केला आहे. या निकालानंतर ते अमेरिकेच्‍या 219 वर्षांच्‍या इतिहासातील पहिले कृष्‍णवर्णीय राष्‍ट्राध्‍यक्ष ठरले आहेत.

ओबामा यांना 338 मते मिळाली तर मेक्‍कन यांना 156 मते मिळाली आहेत. विजयासाठी आवश्‍यक असलेल्‍या 270 मतांपेक्षाही त्‍यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत आतापर्यंतच्‍या इतिहासातील सर्वा‍धिक मतदान झाले आहे. या निवडणुकीच्‍या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 'बदल' या एकाच मुद्यावर ओबामा यांनी ही निवडणूक एक हाती तारून नेली आहे.

डेमोक्रेट ओबामा हे पहिले आफ्रो-अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्ष ठरले आहेत. ओबामा यांनइतिहाघडविलअसूआपअनेवर्षांच्‍यसामाजिभेदभावांनसंपविलआहे, अशशब्‍दाओबामयांच्‍या विजयाबद्दल प्रतिस्‍पर्धी मेक्कन यांनी त्‍यांनशुभेच्‍छा दिल्‍या आहेत.