शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : रविवार, 4 डिसेंबर 2022 (08:14 IST)

सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताना ही काळजी घ्या

charge
Juice Jacking : बऱ्याचदा ट्रेन, विमानतळ इत्यादींमधून प्रवास करताना, मोबाईल फोन डिस्चार्ज झाल्यावर आपण अनेकदा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग सॉकेटमधून फोन चार्ज करतो. पण ही सवय चुकीची आहे. असं केल्याने कधी कधी तुमचे गंभीर नुकसान करू शकते. सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करून, अनेक वेळा हॅकर्स  सहजपणे  फोनमध्ये प्रवेश करू शकतात आणि तुमचे बँक खाते देखील रिकामे करू शकतात.  सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंगमुळे लोकांचे लाखोंचे नुकसान झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याला ज्यूस जॅकिंग म्हणतात. फसवणुकीचे हे तंत्रज्ञान काय आहे आणि ते कसे टाळता येईल हे जाणून घेऊया?
 
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग स्टेशनवर तुमचा मोबाइल चार्ज करू नका. सायबर फ्रॉड्स तुमच्या मोबाईलमधून तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकतात. 
 
 ज्यूस जॅकिंग ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे तुमच्या मोबाईलचा सर्व डेटा USB केबलद्वारे बाहेर काढला जातो आणि या डेटाच्या मदतीने तुमचे खाते हॅक केले जाते. रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिथे मोबाईल चार्जिंग स्टेशन आहेत अशा सर्व ठिकाणी ते तुमच्यासोबत असू शकते
 
 फोन चार्ज करण्यासाठी वापरण्यात येणारी USB केबल हे फक्त चार्जिंग चॅनल नाही तर ते डेटा ट्रान्सफर चॅनेल देखील आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्जिंग स्टेशन चार्जिंगसाठी ठेवता तेव्हा हॅकर्स तुमच्या मोबाइल फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करतात, जेणेकरून ते तुमच्या डिव्हाइसमध्ये सहजपणे घुसू शकतात. ज्यूस जॅकिंगमुळे केवळ तुमचा मोबाईल फोनच नाही तर टॅब्लेट, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणही हॅक होऊ शकतात. 
 
ज्यूस जॅकिंगमुळे होणारे नुकसान पाहता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याबाबत एक सल्लाही जारी केला आहे. आरबीआयने सांगितले की सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग स्टेशनवरून तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले जाऊ शकते. याद्वारे, सायबर फसवणूक करणारे तुमच्या फोनच्या वैयक्तिक डेटा जसे की ईमेल, संदेश, फाइल्स इत्यादीवर प्रवेश करू शकतात. हे टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग स्टेशनचा वापर टाळा. 
 
ज्यूस जॅकिंगच्या प्रतिबंधाबाबत, सायबर तज्ञानी सांगितले की, ज्यूस जॅकिंग टाळण्यासाठी लोकांनी सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग केबल किंवा अडॅप्टर वापरू नये. या चार्जिंग केबल्स आणि अॅडॉप्टरद्वारेच तुमच्या फोनमध्ये सायबर फसवणूक होऊ शकते.