कॉम्प्युटरमध्ये महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित कसे ठेवावे

Last Modified शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (12:22 IST)
आम्ही आपल्या महत्त्वाच्या कागदांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या बॉक्समध्ये ठेवून त्यावरून टाळा लावतो पण ती कागदपत्रे डिजीटल असल्यास आणि त्या फाइल्स कॉम्प्युटरमध्ये असल्यास काय करावं ?

ऍपलच्या मॅक OS आणि विंडोज OS दोन्हीच्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये डेटा इन्क्रिप्ट करण्यासाठीची साधने प्रीलोडेड आहेत. यूजर्स आपल्या सामान्य खात्याने आणि पासवर्ड ने त्याला लॉक आणि अनलॉक देखील करू शकतात. या व्यतिरिक्त यूजर्स आपले दुसरे पासवर्ड देखील सेव्ह करू शकतात.

मॅक OS -
ऍपलच्या मॅक OS वापरणारे यूजर्स फाइल वॉलेट फीचर ला सक्रिय करू शकतात. या साठी सर्वप्रथम System Preferences मध्ये जावं. तिथे आपल्या Security & Privacy असे मिळेल. त्यावर क्लिक करावं. या नंतर आपण FileVault फीचर वर जाता. या मध्ये यूजर आपल्या हार्ड ड्राइव्ह चा सर्व डेटा इन्क्रिप्ट करू शकतात. आपणास USB किंवा पेन ड्राइव्ह मध्ये असलेल्या डेटा ला सुरक्षित ठेवायचे असल्यास आपल्या ला राईट क्लिक करावे लागणार, त्या नंतर आपल्याला Finder वर क्लिक करून Encrypt निवडावे लागणार.
विंडोज OS
मॅक ओएस पेक्षा विंडोज वर फाइल्स ला इन्क्रिप्ट करणं थोडं कठीण आहे. काही संगणक किंवा कॉम्प्युटर स्वतःच फाइल्स इन्क्रिप्ट करतात. याची तपासणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कॉम्प्युटरच्या सेटिंग मध्ये जावे लागणार. नंतर सिस्टम चे निवड केल्यावर 'अबाउट' वर क्लिक करावं. आता खाली स्क्रॉल करा आणि Device Encryption वर क्लिक करा. जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये हे फीचर नाही आहे तर विंडोज या सारखेच आणखी एक फीचर देतं, त्याचे नाव आहे 'बिट लॉकर'. या बिट लॉकर चा वापर करण्यासाठी आपण कंट्रोल पॅनल मध्ये जावे या नंतर सिस्टम ऍड सिक्योरिटी वर क्लिक करा. नंतर स्क्रीन वर दिसत असलेले Manage BitLocker वर क्लिक करावं. बिट लॉकर एक्स्टर्नल ड्राइव्ह सह पेन ड्राइव्ह चा डेटा देखील इन्क्रिप्ट करून देतो.

क्लाउड स्टोरेज म्हणजे काय -
मोबाईल, कॉम्प्युटर आणि पेन ड्राइव्ह मध्ये जो डेटा आपण संग्रहित किंवा स्टोअर करतो ते डेटा स्टोरेज चे डिजीटल माध्यम आहे. क्लाउड स्टोरेज डेटा स्टोअर करण्याचं वर्च्युअल माध्यम आहे. या मध्ये डेटा आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरच्या लोकल ड्राइव्ह मध्ये नसतं. आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरचा डेटा एखादा दुसऱ्या कंपनीच्या सर्व्हर मध्ये संग्रहित केला असतो. आणि आपण या डेटा ला बऱ्याच माध्यमांद्वारे ऍक्सेस करू शकताया डेटा चे व्यवस्थापन होस्टिंग कंपनी कडेअसतं. या मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी ऍप्लिकेशन वापरले जाते. क्लाउड स्टोरेज मध्ये स्पेस कंपनी देते.

बिट लॉकर ने पेन ड्राइव्ह लॉक करा -
पेन ड्राइव्ह किंवा हार्ड डिस्क वर पासवर्ड सेट करण्यासाठी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये 'स्टार्ट' वर क्लिक करा. त्यानंतर कंट्रोल पॅनल वर जावं. इथे आपल्याला उजवीकडे वरील बाजूस 'व्यू बाई' लिहिलेले दिसेल, या वर क्लिक करून 'लार्ज आयकन' निवडा. या नंतर BitLocker Drive Encryption वर क्लिक करावं. एक नवीन स्क्रीन उघडेल त्यामध्ये कॉम्प्युटरशी निगडित ड्राइव्स दिसतील. त्यामध्ये 'पेन ड्राइव्ह' चे पर्याय देखील असणार. त्यासमोर bit locker असे लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करावं असे केल्यास एक नवी विंडो स्क्रीन उघडेल, ज्या मध्ये आपल्याला पेन ड्राइव्हसाठी पासवर्ड टाईप करावे लागणार. त्या नंतर आपल्याला स्क्रीन वर नेक्स्ट चे पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावं आणि पुढे जा. आता स्क्रीन वर दोन पर्याय येतील त्यामध्ये वरील बाजूस save the password लिहिलेलं असेल ते निवडा. या नंतर यूजर्सची पेन ड्राइव्ह सहजरीत्या सुरक्षित होईल.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

COVID-19 Vaccination: कमकुवत इम्यूनिटी असणार्‍या लोकांनी ...

COVID-19 Vaccination: कमकुवत इम्यूनिटी असणार्‍या लोकांनी कोवाक्सिनचा डोस अजिबात घेऊ नका - भारत बायोटेकने फॅक्टशीट प्रसिद्ध केले
Covid Vaccine Update: बरेच लोक भारत बायोटेकच्या औषध नियंत्रक ऑफ इंडिया कोव्हॅक्सिन 19 लस ...

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लहान मुले गायब होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आता या ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती कायम
उत्तरेकडून येणारे वाऱ्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने ...

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात
मुंबईसह राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 'कोविन' अॅपमधील बिघाडामुळे ...

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ...