शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : सोमवार, 13 जून 2022 (22:28 IST)

Maharashtra Apang Pension Yojana 2022 :अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2022 अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, जाणून घ्या

Maharashtra Apang Pension Yojana 2022 : महाराष्ट्र शासन राज्यातील प्रत्येक घटकासाठी एक योजना आणत आहे. राज्यातील दिव्यांगांना मदत करण्यासाठी शासनाने दिव्यांग योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत अपंग असलेल्या लोकांना सरकार आर्थिक मदत करेल.
 
अपंग लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. कोणतेही अपंगत्व असल्यास ती व्यक्ती नोकरी करू शकत नाही. या लोकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना 2022 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थींना सरकारकडून दरमहा 600 रुपये पेन्शन दिली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान 80% अपंगत्व असणे आवश्यक आहे.अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
 
योजनेचा उद्देश
अपंग निवृत्ती वेतन योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांगांना आर्थिक मदत करणे हा आहे. दिव्यांग लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.आता अपंगांना पैशासाठी इतरांसमोर हात पसरण्याची गरज भासणार नाही कारण  या योजनेअंतर्गत अपंगांना दरमहा 600 रुपयांची मदत मिळते. 
 
योजनेचे फायदे-
* राज्यातील दिव्यांगांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
* दिव्यांग लोकांना रोजगार मिळेल, ते सहज आपला उदरनिर्वाह करू शकतील.
* योजनेंतर्गत लाभार्थीला दरमहा 600 रुपये पेन्शन दिले जाईल.
* 80% अपंगत्व असलेल्या लोकांना योजनेचा लाभ दिला जाईल.
* अपंग निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र अंतर्गत दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल, त्यामुळे लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
 
 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
* आधार कार्ड
* बँक खाते पासबुक
* मोबाईल क्रमांक – अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असावा. 
* ओळखपत्र
* पत्त्याचा पुरावा
* 80% अपंगत्वाचे प्रमाणपत्र
* पासपोर्ट आकाराचा फोटो
* आय प्रमाण पत्र
* वय प्रमाणपत्र
 
महाराष्ट्र अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्रता-
* अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
* अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
* या योजनेत केवळ 80% अपंगत्व असलेली व्यक्तीच अर्ज करू शकते.
* लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.35,000 पेक्षा जास्त नसावे.
* तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुम्ही या योजनेत अर्ज करू शकत नाही.
 
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल, तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:-
 
* अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला https://sjsa.maharashtra.gov.in/ भेट द्यावी लागेल. या लिंकवर क्लिक करून वेबसाइटच्या होम पेज उघडेल.
* वेबसाइटवर आल्यानंतर, तुम्हाला अपंग पेन्शन योजनेसाठी नोंदणीचा ​​पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
* क्लिक केल्यानंतर, अर्जाचा फॉर्म आपल्यासमोर नवीन पृष्ठावर उघडेल. तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल, त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
 
ऑफ लाईन अर्ज कसा करावा-
* ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम जिल्हाधिकारी/तहसीलदार/तलाठी यांच्या कार्यालयात जावे लागेल.
* तिथे जाऊन तुम्हाला हा महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना फॉर्म घ्यावा लागेल.
* फॉर्म डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंकवर क्लिक करा.
* फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक एंटर करा, नंतर तुमची कागदपत्रे संलग्न करा आणि संबंधित विभागाकडे सबमिट करा.
* तुमच्या फॉर्मच्या पडताळणीनंतर तुमचे पेन्शन सुरू होईल.