शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (15:35 IST)

घर बदलले आहे,आधार कार्डात पत्ता बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आधार कार्ड हे भारतातील सर्व नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. भारत सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता यासंबंधीचा तपशील असतो.या कार्डात योग्य तपशील आणि अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे, जर आपण आपले घर बदलले असेल तर आधार कार्डात पत्ता बदलणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक समस्या उद्भवू शकतात.

आधारमध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रियाही ऑनलाइन सुरू झाली आहे. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपण अगदी सहजपणे पत्ता बदलू शकता. चला तर मग जाणून घेऊया की आपण  आधार कार्डमध्ये पत्ता कसा अपडेट करू शकता, यासाठी ही प्रक्रिया अवलंबवा. 
 
आधार कार्डमधील पत्ता बदलण्याची प्रक्रिया 
1 सर्व प्रथम UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जा. यानंतर माय आधार(MY Aadhaar)  विभागात जा.
 
2 येथे  Update Your Aadhaar कॉलम दिसेल, ज्यामध्ये आपल्याला Update Demographics Data Online वर क्लिक करावे लागेल.
 
3 यानंतर UIDAI चे सेल्फ  सर्विस अपडेट पोर्टल (SSUP) ssup.uidai.gov.in आपल्या समोर उघडेल. येथे आपल्याला Proceed to Update Aadhaar पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 
4 आता आपल्याला आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकण्यास सांगितले जाईल. यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, OTP टाका आणि सबमिट करा. 
 
5 OTP टाकल्यानंतर आपल्याला Update Demographics Data वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला  Address वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Proceed वर क्लिक करा.
 
6 यानंतर आपल्याला आपला जुना पत्ता दिसेल आणि खाली काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि वैध कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. 
 
7 पत्त्याचे पुन्हा एकदा पूर्वावलोकन करा आणि त्यानंतर अंतिम सबमिट करा. यानंतर,आपल्याला एक अपडेट रिक्वेस्ट नंबर म्हणजेच URN मिळेल, ज्याच्या मदतीने आपण UIDAI वेबसाइटवर स्टेटस तपासू शकता.