Dharma Sangrah
✕

तुमच्या Aadhaarवरून किती सिम अॅक्टिव्हेट झाल्यात, जाणून घ्या ऑनलाइन

Updated: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:10 IST)
 
तुमच्या आधार क्रमांकावर किती सिम सक्रिय आहेत हे जाणून घेण्यासाठी सरकारने एक पोर्टलही तयार केले आहे. दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच एक पोर्टल टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) लाँच केले आहे. या पोर्टलद्वारे, वापरकर्ते त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात.
 
TAFCOP वेबसाइटद्वारे, तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम जारी केले आहेत हे सहजपणे शोधू शकता. तुमच्या नकळत तुमच्या आधार क्रमांकाशी कोणताही मोबाइल क्रमांक जोडला गेला असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रारही करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमचा जुना आणि न वापरलेला क्रमांक तुमच्या आधारमधून सहजपणे वेगळे करू शकता. Q
लिंक केलेले सिम कसे तपासायचे?
1.  तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाइल सिमबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जाणे आवश्यक आहे.
2.  येथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल.
3.  यानंतर तुम्हाला 'Request OTP' बटणावर क्लिक करावे लागेल.
4.  यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल.
5.  त्यानंतर, तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.
6.  जेथे वापरकर्ते वापरात नसलेले किंवा यापुढे आवश्यक नसलेले नंबर नोंदवू शकतात आणि ब्लॉक करू शकतात.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

सिंहगड किल्ल्यावर फडकणार १०० फूट उंच भव्य भगवा ध्वज! पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

ग्लेन फिलिप्सच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सलग दुसरा टी२० सामना जिंकला

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकादमी अमरावती येथे सुरू होणार

राहुल गांधी रामलीला मैदानावर म्हणाले, ज्ञानेश कुमार तुरुंगात जातील, ही सामान्य चोरी नाही

पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

पुढील लेख
Show comments