1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (20:51 IST)

SBIचे एटीएम हरवले? अशा प्रकारे कार्ड ब्लॉक करा; संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घ्या

आजचे युग डिजिटल आहे. सर्व काही ऑनलाइन आहे. पेमेंट करण्यापासून ते तिकीट बुकिंगपर्यंत सर्व काही आपण एटीएम कार्डने करू शकता. पण आपले  एटीएम कार्ड हरवले तर? मग आपल्या समोर मोठे संकट उभे राहू शकते. अनेक वेळा निष्काळजीपणामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे आमचे कार्ड ब्लॉक होत नाही, त्यामुळे आमचे मोठे नुकसान होते. SBI डेबिट कार्ड कसे ब्लॉक करायचे ते जाणून घेऊया. 
 
कार्ड ब्लॉक करण्यासाठी स्टेप बाय स्टेप पद्धत समजून घ्या 
 
1- टोल फ्री क्रमांक 1800-11-22-11/1800-425-3800 वर कॉल करा. 
 
2- त्यानंतर शून्य दाबा. 
 
3- जर तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कार्ड नंबर वापरत असाल तर एक दाबा. परंतु नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि खाते क्रमांकाद्वारे कार्ड ब्लॉक करायचे असल्यास 2 दाबा. 
 
4- जर आपण 1 निवडला असेल, तर मोबाइल नंबर आणि एटीएम कार्डचे शेवटचे पाच क्रमांक टाका. त्यानंतर एक-एक करून पुष्टी करा. त्यानंतर 2 दाबा आणि एटीएमचे शेवटचे पाच अंक लिहा. 
 
5- कार्ड ब्लॉक झाल्याची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळेल. 
 
रिप्लेसमेंटसाठी या चरणांचे अनुसरण करा 
 
1- आपल्यालाकार्ड बदलायचे असल्यास 1 दाबा. 
 
2- Previous Menu साठी अंक 7 दाबा. 
 
3- Main Menuसाठी अंक 8 दाबा
 
4- तुमची जन्मतारीख टाका, त्यानंतर कार्ड आपल्या पत्त्यावर पाठवले जाईल. 
 
5-अंक 1 दाबून प्रक्रियेची पुष्टी करा. 
 
याशिवाय नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि खाते क्रमांकाच्या माध्यमातून कार्ड ब्लॉक करून बदलून घेता येईल. यासाठी काय प्रक्रिया आहे ते जाणून घ्या 
 
1- अंक 2 दाबा, ज्या खात्याचे कार्ड ब्लॉक करायचे आहे त्याचे शेवटचे 5 अंक लिहा. 
 
2- माहितीची पुष्टी करण्यासाठी एक दाबा. 
 
3-त्या नंतर 2 दाबा आणि खात्याचे शेवटचे 5 अंक पुन्हा टाइप करा. 
 
4- यानंतर 1 दाबून पुष्टी करा. आपल्याला कार्ड ब्लॉक करण्याबाबत एसएमएसद्वारे माहिती मिळेल. 
 
रिप्लेसमेंट साठी या चरणांचे अनुसरण करा
 
1- तुम्हाला तुमचे कार्ड बदलायचे असल्यास 1 दाबा. 
 
2- Previous Menuसाठी अंक 7 दाबा. 
 
3- Main Menuसाठी अंक 8 दाबा
 
4- त्यानंतर 1 दाबून रिप्लेसमेंट कार्डसाठी अर्ज करा. 
 
5- तुमची जन्मतारीख प्रविष्ट करा आणि पुष्टी करा.